गूगल प्ले स्टोरवरून ‘पेटीएम’ झाले नाहीसे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020
Total Views |
Paytm_1  H x W:


नियमांचे उल्लंघन झाल्याने गुगलची कारवाई!


मुंबई : डिजीटल व्यवहारातील अग्रगण्य समजले जाणारे पेटीएम अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. यामुळे आता गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम डाऊनलोड करता येणार नाही. यामुळे लाखो पेटीएम युजर्सना धक्का बसला आहे. पेटीएमने गुगलच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्याने हे अ‍ॅप्लिकेशन हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर भारतामध्ये डिजिटल व्यवहारांना गती मिळाली. अनेकांनी त्यानंतर लहान मोठ्या कामांसाठी पेटीएमसारखे ऑनलाईन अ‍ॅप डिजिटल व्यवहारांसाठी वापरण्याला पसंती दर्शवली. मात्र आज गॅमलिंग पॉलिसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम हटवण्यात आले आहे. यानंतर सामान्य युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यावर काही वेळापूर्वीच पेटीएम कडून स्पष्टीकरण जाहीर करण्यात आले आहे. पेटीएम युजर्सचे पैसे सुरक्षित असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.


पेटीएमने ट्वीटरच्या माध्यमातून दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये पेटीएम अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तात्पुरते गूगल प्ले स्टोअर वरून नव्या डाऊनलोड्स आणि अपडेट साठी उपलब्ध नसेल, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र कंपनीला आशा आहे की लवकरच हे अ‍ॅप उपलब्ध होईल. दरम्यान ज्यांनी यापूर्वीच अ‍ॅप डाऊनलोड केले असेल, त्यामध्ये वॉलेटमध्ये पैसे असतील तर ते सुरक्षित आहेत. तुम्ही ते आधीप्रमाणेच अगदी सामान्यपणे वापरू शकता, असे पेटीएमकडून सांगण्यात आले आहे.


@@AUTHORINFO_V1@@