दिल्ली हिंसाचार प्रकरण : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीदला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020
Total Views |

Umar Khalid_1  
 
नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीद याला अटक केली आहे. उमरवर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचार प्रकरणी त्याला रविवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याचा तपास पोलिसांचे विशेष पथक करत आहे. त्यासाठी याआधीही उमर खालिदवरची चौकशी झाली होती. या चौकशी दरम्यान, उमर खालिद हिंसाचाराबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. इतकेच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्यारपूर्वी दिलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिदची कसून चौकशी करण्यात आली होती.
 
 
यूनायडेट अगेंस्ट हेट संस्थेचे वकील तमन्ना पंकज यांनी उमर खालिदला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील एफआयर ५९ मध्ये यूएपीए अंतर्गत बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@