दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह

    05-Jun-2020
Total Views | 232
Dawood_1  H x W




पत्नीसह कराची आर्मी रुग्णालयात दाखल



इस्लामाबाद : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी दोघेही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त आहे. दोघांनाही कराचीच्या आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगभरात हाहाःकार माजवलेल्या कोरोनाचा पाकिस्तानातही शिरकाव झाला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आढळत आहेत. दाऊदला कोरोना झाल्याचे पाक सरकार लपवत असले तरीही दोघांनाही नेण्यासाठी सैन्यदलाची रुग्णवाहिका दाखल झाली होती हे उघड झाले आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम बराचकाळ पाकिस्तानात लपून बसला आहे. पाकिस्तान सरकारने याबद्दल वारंवार जगाची दिशाभूल केली आहे. मात्र, याबद्दलचे अधिकृत पुरावे पाकिस्तानला भारताने सादर केले आहेत. अहवालानुसार कोरोना विषाणू आता दाऊदच्या घरापर्यंत पोहोचला आहे. दाऊद आणि त्याच्या पत्नीत कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन यांना पाकिस्तानी सैन्यदलाच्या रुग्णालायत भरती करण्यात आले आहे. दाऊदच्या घरी काम करणाऱ्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड
१९९३मध्ये मुंबईत बॉम्बस्फोटांनी हादरली होती. दाऊद या घटनेचा मास्टरमाईंड होता. देश सोडून पळाल्यानंतर त्या काळापासून मुंबई पोलीस आणि भारत सरकार त्याच्या मागावर आहे. कित्येक वर्षे तो कराचीमध्ये राहत आहे. काही महिन्यांपूर्वी तो कराचीच्या रस्त्यांवर फिरत असल्याच्याही बातम्या होत्या. कोरोनामुळे तो गंभीर असल्याचे समजत आहे. दाऊद आणि जुबीना यांची चार मुले आहेत. तीन मुली माहरूख, माहरीन आणि मारीया तसेच मुलाचे नाव मोईन आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121