कोरोनाच्या कामात नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करा : भाजप

    28-Jun-2020
Total Views | 32

covid _1  H x W




मुंबई :
कोविड १९च्या कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण उपसचिवांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यमुक्त करावे अशी मागणी भाजपा शिक्षक सेलने एमएमआरमधील शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत काल भाजप शिक्षक सेल मुंबई विभाग व जनता शिक्षक महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तसेच एमएमआर मधील महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना मेल पाठवून मागणी केली आहे.




कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, मीरा, भाईंदर भिवंडी, उल्हासनगर मनपा तसेच एमएमआर क्षेत्रातील अन्य नगरपालिकांनी शिक्षकांच्या सेवा मोठ्या प्रमाणात अधिग्रहित करून त्यांना विलगिकरण कक्ष तसेच कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी जुंपले आहे. त्यातच आता शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शिक्षकांना तातडीने स्थानिक प्रशासनाकडून कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षणाधिकार्यांनी कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा शिक्षक सेलचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. त्यांच्यासह भाजपा शिक्षक सेल मुंबई विभाग संयोजक सचिन पांडे, विजय धनावडे, सुभाष अंभोरे व बयाजी घेरडे यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121