होम क्वारंटाईनच्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचे केंद्राचे राज्यांना आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2020
Total Views |

home quaratine_1 &nb




नवी दिल्ली
: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १० मे २०२० रोजी होम क्वारंटाईनबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. हेच दिशानिर्देश आजही लागू असून होम क्वारंटाईन प्रभावीपणे होण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व राज्यांना कण्यात आल्या आहेत.



मार्गदर्शक सूचनांनुसार, कोविड-१९ची अत्यंत सौम्य आणि पूर्व लक्षणे असणारे रुग्ण होम क्वारंटाईनचा पर्याय स्वीकारू शकतात; मात्र त्यासाठी त्या रुग्णाला घरात शौचालय असलेल्या स्वतंत्र खोलीची सुविधा तसेच त्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी प्रौढ व्यक्ती किंवा इतर काळजी घेणारी व्यक्ती असावी. त्याचबरोबर रुग्णाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आरोग्याच्या सद्यस्थिती विषयी नियमितपणे जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांना कळविण्याबाबत ती व्यक्ती सहमत असली पाहिजे.



सुधारित दिशानिर्देशांमधील एक महत्त्वाचा कलम असा आहे की, होम क्वारंटाईनचा पर्याय स्वीकारलेल्या व्यक्तीचे वैद्यकीय मूल्यांकन आणि त्याच्या निवासी मूल्यांकनाबाबत उपचार करणारे डॉक्टर समाधानी असले पाहिजेत. याव्यतिरिक्त, रुग्ण स्वत:च्या विलगीकरणाविषयीचा तपशील ठेवेल आणि होम क्वारंटाईनच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करेल. गृह विलगीकरणाच्या अशा सर्व प्रकरणात अनुभवी डॉक्टरांच्या पथकाकडून नियमितपणे नंतरही देखरेख ठेवली जाईल; तसेच त्यांच्या बरे होण्याबाबतचा अहवाल आवश्यक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून दिला जाईल.


केंद्राने हे दिशानिर्देश देण्याचे कारण म्हणजे काही राज्यांमध्ये अशी उदाहरणे समोर आली आहेत ज्यात काही घरगुती विलगीकरणाची परवानगी अशीच दिली जात आहे. तसेच सुधारित मार्गदर्शक तत्त्वांतील कलमांचे पालन आत्मीयतेने आणि काटेकोरपणे केले जात नाही. यामुळे, विशेषत: दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये कुटुंबातील सदस्यांना आणि शेजाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. कोविड-१९ महामारीच्या प्रसाराला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी कार्यक्षेत्र पातळीवर होम क्वारंटाईन मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी विनंती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@