सध्याच्या घडीला देशाची सुरक्षा महत्त्वाची; सरचिटणीस चंपत राय यांची माहिती
अयोध्या : भारत-चीन सीमेवरील तणावाचा अयोध्येत राम मंदिर निर्मितीवरही परिणाम झाला आहे. मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सध्यासाठी स्थगित करण्यात आला आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, ‘अशा वातावरणात मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम योग्य नाही, म्हणून आता पुढील काम फक्त अनुकूल परिस्थितीतच सुरू होईल. ते म्हणाले की, सध्या मंदिर बांधणी व भूमिपूजनासाठी कोणताही कार्यक्रम आखण्यात आलेला नाही.’
चंपत राय म्हणाले की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट याबद्दलची अधिकृत माहिती नंतर जाहीर करेल. ते म्हणाले की, भारत-चीन सीमेवर तणावामुळे भूमीपूजनासाठी हा योग्य काळ नाही. सीमेवर ठार झालेल्या शूर सैनिकांना ट्रस्टनेही श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, देव सर्व शूर शहीदांच्या आत्म्यास शांती देवो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते भूमीपूजन होणार होते.मात्र या घडीला देशातील सुरक्षा आपल्या सर्वांसाठी सर्वोपरि आहे. मंदिराच्या बांधकामाची तारीख देशाची परिस्थिती पाहता पुढील निर्णय होईल, चंपत राय म्हणाले
राम मंदिर बांधण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. मंदिरासाठी निश्चित केलेल्या जागेचे सपाटीकरण व साफसफाईचे काम पूर्ण झाले आहे. भूमिपूजनानंतर मंदिर बांधण्याचे तांत्रिक काम सुरू होईल. तथापि, चीनशी असलेले तणाव लक्षात घेता ट्रस्टने भूमीपूजन कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे.