बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020
Total Views |

Badrinath_1  H


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य पुजाऱ्यासह केवळ २८ जणांना उपस्थितीची मंजुरी


उत्तराखंड : केदारनाथ पाठोपाठ आज उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. सध्या देशभरात असलेल्या कोरोना व्हायरसचं संकट पाहता यंदा बद्रीनाथ मंदिर मुख्य पुजार्‍यासह केवळ २८ जणांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे ४.३०च्या सुमारास हे मंदिर उघडण्यात आले. दरम्यान बद्रीनाथ मंदिराचे मुख्य पुजारी केरळहून परतल्यानंतर त्यांची त्यांना काही काळ क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे पहायला मिळाले.


मागील आठवड्यात जोशी मठात पोहचल्यानंतर मुख्य पुजारांचा इंस्टिट्युशनल क्वारंटाईन काळ संपल्यानंतर दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. दरम्यान शुक्रवारी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी संपूर्ण मंदिरावर फूलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. पहाटेच्या गणेश पूजेनंतर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर भगवान नारायणावर तेलाचा अभिषेक झाला. आज भगवान बद्रीनाथासोबतच आयुर्वेदाची देवता असलेल्या धन्वंतरीची देखील पूजा करण्यात आली. सध्या भारतासह जगावर घोंघावणार्‍या कोरोना संकटाला संपवण्याची प्रार्थनाही करण्यात आली.


२९ एप्रिल दिवशी ६ महिन्यांच्या हिवाळी सुट्टीनंतर केदारनाथ मंदिराचेदेखील दरवाजे उघडण्यात आले आहेत. मात्र भाविकांना यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान दरवरर्षी साधारण या महिन्यातच बद्रीनाथ, केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळा ओसरल्यानंतर उघडतात.
@@AUTHORINFO_V1@@