कोरोनाला हरवणं शक्य आहे ! तरुणाने जिंकला कोरोनाविरुद्ध लढा

    02-Apr-2020
Total Views | 70

bihar_1  H x W:


पटना
: जगभरातून कोरोनाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. परंतु या आजाराने घाबरून ना जाता, इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करणे शक्य आहे. कोरोनामुळे मानसिकरित्या खचलेल्या सर्वांसाठी बिहारमधील एक तरुण आशेचा किरण ठरला आहे. तब्बल १० दिवस जीवनमृत्यूशी झुंज दिल्यानंतर या तरुणाने कोरोनाविरोधात लढा जिंकला आहे आणि इतरांनाही त्याने बळ दिले आहे.


पटनातील एनएमसीएच रुग्णालयातून तरुणाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर हा तरुण होम क्वारंटाइन करण्यात आला आहे. मार्चमध्ये स्कॉटलंडहून हा तरुण भारतात परतला. कालांतराने त्याची तब्येत बिघडू लागली. २० मार्चला त्याला पटनातील एम्समध्ये दाखल करण्यात आले. सर्दी, खोकला, ताप असल्याने २१ मार्चला त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली व त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर २२ मार्चला त्याला एनएमसीएचमधील संसर्गजन्य आजारासाठी असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्याठिकाणी त्याच्यावर १० दिवस उपचार करण्यात आले. उपचाराअंती त्याची दुसरी कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली. पुन्हा २ दिवसांनी करण्यात आलेल्या चाचणीचा अहवालही नेगेटिव्ह आला. त्यामुळे या तरुणाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र पुढील १४ दिवसांसाठी त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.



अशारितीने या तरुणाने कोरोनाविरोधातील लढा तर जिंकलाच पण इतरांनाही जगण्याचे बळ दिले आहे. घरी सोडल्यांनंतर हा तरुण म्हणाला, सामान्य लोकांनी कोरोनाव्हायरसला बिलकुल घाबरू नका आणि ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे, त्यांनी याचा बिनधास्तपणे याचा सामना करा. कोरोना पीडीत रुग्णांनी संयम बाळगावा. तसेच डॉक्टर जे सल्ला देत आहेत, त्याचं तंतोतंत पालन करा, असे आवाहनही केले.



तरुणाने कोरोनावर मात केल्यानंतर त्यालाच नाही, तर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही याचा आनंद झाला आहे. एनएमसीएच कोरोना रुग्णालयाचे नोडल पदाधिकारी डॉ. अजय कुमार सिन्हा यांनी सांगितले की, "जर कोरोनाग्रस्त व्यक्ती योग्य वेळेत रुग्णालयात दाखल झाला तर त्याच्यावर योग्य उपचार सुरू होतात आणि तो बरा होण्याची शक्यता वाढते. या तरुणप्रमाणे देशातील अनेकांनी महाभयंकर कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १३२ रुग्णांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाव्हायरसला हरवणं शक्य आहे, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.
नाव्हायरसला हरवणं शक्य आहे, हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121