कोरोना हा आजार स्वाईनफ्ल्यूपेक्षा १०पट अधिक धोकादायक : WHO

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2020
Total Views |

tedros ednemn_1 &nbs



जिनिव्हा
: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातला आहे. कोरोनाच्या संसर्गाने जगभरात एक लाखाहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, १९ लाखांहून अधिकजणांना संसर्ग झाला आहे.जगभरात करोनाच्या संसर्गाच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत देशांना वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. अशातच वर्ष २००९ मध्ये आलेल्या स्वाइन फ्लूपेक्षा (एच१एन१) कोरोना (कोव्हीड 19) दहापटीने अधिक धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.




जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ.टेड्रोस एडनम यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग जगभरात वेगाने फैलावत असून हा संसर्ग २००९ मध्ये आलेल्या स्वाइल फ्लूपेक्षा ही अधिक धोकादायक आहे. यावर सध्यातरी सोशल डिस्टंसिंग हा एकमेव उपाय आहे.असेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनसह इतर निर्बंधही टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत २२ हजार, ब्रिटनमध्ये ११ हजार आणि इटलीत २० हजारजणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने युरोपमध्ये सर्वाधिक थैमान घातले आहे.
@@AUTHORINFO_V1@@