रामनवमीच्या आरतीत प्रथमच भाविकांना सहभागी करणार

    15-Mar-2020
Total Views | 52
Mahant Satendra Das_1&nbs
 
 

रामलल्लाचे मुख्य पुजारी महंत सतेंद्र दास यांची माहिती



अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलात भाविकांना पुढील महिन्यात रामनवमी उत्सवाच्या काळात आरतीत सहभागी होता येणार आहे. आजवरच्या इतिहासात अशा प्रकारची व्यवस्था प्रथमच करण्यात येत आहे. रामनवमीच्या आधी रामलल्लाची मूर्ती सध्याच्या तात्पुरत्या मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या दुसर्यार ठिकाणी हलविण्यात येणार आहे. सध्या जिथे रामलल्ला विराजमान आहे, तिथे फक्त मंदिराचे मुख्य पुजारी महंत सतेंद्र दास आणि त्यांचे चार अनुयायी दररोज आरती व पूर्जा करतात. 


यात भाविकांना कधीच सहभागी करून घेण्यात आले नाही. मात्र, या रामनवमीच्या काळात भाविकांना आरतीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती महंत दास यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने, रामलल्लाची मूर्ती याच महिन्यात दुसरीकडे हलविण्यात येत आहे. ही जागा बर्या पैकी प्रशस्त आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने, यावर्षी रामनवमी उत्सव रद्द करण्यात यावा, अशी मागणी विविध स्तरावरून केली जात आहे, पण आम्ही अद्याप याव कुठलाही निर्णय घेतला नाही, असे त्यांनी सांगितले. यावर्षीचा रामनवमी उत्सव आमच्यासाठी विशेष आहे. या उत्सवात भाविकांना सहभागी होता येणार आहे, तसेच हा उत्सव अधिक भव्यपणे साजरा करण्यासाठी निधीही उभारता येणार आहे, असे ते म्हणाले.


 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121