मुंबई : सुपरमॉडेल मिलिंद सोमण यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुने संबंध असल्याचे समजताच डाव्या संघटनांचा एक मोठा वर्ग त्यांचा विरोध करत आहेत. नुकतेच त्यांचे 'मेड इन इंडिया - ए मोमॉयर' हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. सोमण यांच्याबरोबर लेखक रूपा पै यांनी सह-लेखन केले. त्यांनी या पुस्तकावरील चर्चेदरम्यान सांगितले की, जेव्हा ते दहा वर्षांचे होते तेव्हा ते नियमितपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असत. मिलिंद मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मोठे झाले, तेथे बरीच मुले संघ शाखेत जात असत. मात्र त्यांच्या या अनुबंधावांमुळे मात्र डाव्यांना चांगलाच पोटशूळ उठला आहे.
मिलिंद म्हणाले की, "ते राजकारणात नव्हते किंवा त्यांच्या कुटूंबातील कोणीही राजकारणात नव्हते परंतु त्यांचे वडील नियमितपणे रा. स्व. संघ शाखेत जात असत." मिलिंद सोमण यांनी संघाचे कौतुक करणारे आपले काही अनुभव सांगितले : “त्यावेळी मी १० वर्षांचा होतो आणि मी खेळामध्ये सहभाग घ्यायचो आणि शिस्तीत राहायला शिकलो. मी संघ शाखेसह दोन किंवा तीन शिबिरांमध्ये जात होतो, जिथे माझ्यासारखे हजारो मुले येत असत. चांगले नागरिक कसे व्हायचे, स्वावलंबी कसे व्हावे हे आम्हाला त्याच वेळी सांगण्यात आले. त्यावेळी मी शिकलो जी शिस्त मला लागली ती पाळत आहे. "
मिलिंद सोमण यांनी असेही सांगितले की,'रा. स्व. संघाच्या सानिध्यात असताना कुठेही वाटले नाहीत की ही संघटना राजकीय आहे. इथे मला कुठेही राजकारण दिसले नाही. ते म्हणाले की, ते संघातील ज्या लोकांशी परिचित होते, ज्यांना भेटायचे तेही कधी राजकारणी वाटत नव्हते. तथापि नंतर ते म्हणाले की, संघ परिवार कालांतराने राजकीय संघटनांत्मक झाला असेल.' पुढे मिलिंद सोमण म्हणाले की, त्यांच्या वडिलांचा असा विश्वास होता की संघ शिबिरात जाऊन त्यात सहभाग घेतल्याने एका लहान मुलामध्ये शिस्त, जीवनशैली, फिटनेस आणि विचारसरणीत बरेच सकारात्मक बदल घडतात. यामुळे मात्र डाव्या संघटनांनी मिलिंद सोमण यांना सोशलमिडीयावर ट्रोल केले.