किशोर तिवारींना आवरा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2020   
Total Views |


vedh_1  H x W:



अमृता फडणवीस यांना माणूस, भारतीय नागरिक म्हणून मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नाही का? अमुक एका नेत्याच्या पत्नी स्वयंपाकघर, माजघराच्या बाहेर आल्या नाहीत म्हणून अमृता फडणवीस यांनीही येऊ नये, हा कोणता न्याय आहे आणि हे ठरवणारे किशोर तिवारी कोण?



अमृता फडणवीस चर्चेत होत्या आणि आहेत
. त्यांचा गुन्हा काय तर त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र आहे, भारतीय समाजसंस्कृतीचे सर्व नातेसंबंध जपताना अमृता यांनी स्वत्वही जपले, राजकीय गदारोळात, मम म्हणत कठपुतळी म्हणून न मिरवता जे वाटते, ते स्वतःच्या शब्दांत, विचारांत मांडण्याचा प्रयत्न केला. जे चूक आहे, त्याला चूक म्हणण्याचा प्रयत्न केला. पती मुख्यमंत्री असताना किंवा आता नसतानाही केवळ भारतीय नागरिक म्हणून राजकीय, सामाजिक विषयावर विचार मांडले.



यावर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी अमृता यांना अपराधीच ठरवले आहे
. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना लिहिलेल्या पत्रात तिवारी यांनी म्हटले आहे की, “अमृता फडणवीस यांना आवरा, अमृता यांचं राजकीय अ‍ॅक्टिव्हिझम हे भारतीय राजकारणातील पत्नी संस्कृतीला धक्का लावणारं आहे.” खरे म्हणजे या तिवारींनाच आवरायला हवे. भारतीय संविधानानुसार व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. अमृता फडणवीस यांना माणूस, भारतीय नागरिक म्हणून मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नाही का? अमुक एका नेत्याच्या पत्नी स्वयंपाकघर, माजघराच्या बाहेर आल्या नाहीत म्हणून अमृता फडणवीस यांनीही येऊ नये, हा कोणता न्याय आहे आणि हे ठरवणारे किशोर तिवारी कोण?


चौकटीतल्या घेट्टोत गुदमर
, मर

तू याची आई, त्याची पत्नी, माणूस म्हणून जगू नकोस

या असल्या मनोवृत्तीतून महाराष्ट्र केव्हाच बाहेर आलाय. किशोर तिवारी तुम्ही आणि तुमच्यासारखेच पुरुषी सरंजामशाहीच्या विहिरीतले बेडूक या हिने असे वागावे, तिने तसे वागावे, अशा चकाट्या पिटण्यातच मग्न आहेत. पण राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, माँसाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा असलेला हा महाराष्ट्र आहे. एखाद्या राष्ट्राची, समाजाची प्रगती पाहायची असेल तर त्या समाजातील, राष्ट्रातील महिलांची स्थिती पाहावी, असे ठणकावून सांगणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी आहे. इथे किशोर तिवारींसारख्या संकुचित आणि स्त्रियांना गुलाम समजणार्‍यांना काडीचीही किंमत दिली जाणार नाही.



भुजबळसाहेब टेन्शन नॉट
!



छगन भुजबळ स्वत
:ला ओबीसी नेता समजतात. पण ओबीसीमध्ये किती जाती आहेत, त्यांची लोकसंख्या किती आहे आणि ते छगन भुजबळांना आपला नेता तर सोडाच आपला माणूस मानतात का? उत्तर नकारात्मकच आहे. हे मी खात्रीने म्हणू शकते, कारण अठरापगड जातींच्या ओबीसी समाजाला माळी आणि वंजारी समाजाच्या संख्याबाहुल्यावरून तोलणार्‍या राजकारण्यांमधले भुजबळसुद्धा एक प्यादे आहेत. हे ओबीसी समाज ओळखून आहे. तर भुजबळ म्हणाले, “जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही.” मग प्रश्न उपस्थित होतो की, स्वत:चा जन्मदाखलाही नसलेले भुजबळ इतक्यावेळा निवडणुकीला कोणती प्रमाणपत्रे देऊन उभे राहिले. स्वत:ची जात ओबीसी आहे, हे सिद्ध करताना त्यांनी जातीचे प्रमाणपत्रही काढले असेलच. मग ते प्रमाणपत्र काढताना त्यांनी आपल्या अस्तित्वाचे दाखले म्हणून कोणते पुरावे दिले असतील? वर भुजबळ यांचे म्हणणे आहे की, ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाकडे आजही कागदपत्रे नाहीत, त्यामुळे सीएए आणि एनआरसीचा त्यांना त्रास होईल.



तर भुजबळांनी याबाबत महाराष्ट्रामध्ये जरूर फिरावे
. भुजबळ समजतात, तितका महाराष्ट्र अधोगामी राहिलेला नाही. प्रत्येक समाजगटात सुधारणा होत आहे. त्या त्या समाजाची स्वतःची मंडळे अगदी जातपंचायतीही समाजातल्या लोकांची कागदपत्रे असावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. उदाहरणच घ्यायचे तर ओबीसी म्हणून हातात शून्य शून्यच आलेले भाट, डवरी गोसावी, भिल्ल, कातकरी समाज पाहा, त्या समाजातही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे नाही, ते नाही म्हणून तुम्ही घाबरता, समाज घाबरत नाही. कारण त्याला माहिती आहे की, तो या देशाचा लेकरू होता, आहे आणि राहिल. असो. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, छगन भुजबळसाहेब तुम्हाला जन्माचा दाखला देण्याची गरजच नाही. कारण ते अचाट आणि तितकाच अफाट भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात होते. त्यावेळी वेळी-अवेळी त्यांच्या छातीत कळ यायची. तेव्हा उपचारासाठी किंवा इतर कारणांसाठी जामिनावर सुटण्यासाठी तुम्ही जी कागदपत्रे वापरली, तीसुद्धा तुमचे अस्तित्व सिद्ध करूच शकतात. त्यामुळे टेंशन नॉट!

@@AUTHORINFO_V1@@