पाकिस्तानकडून कठुआमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

    15-Feb-2020
Total Views | 42

pakistan_1  H x
कठूआ : जम्मूमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या सेनेच्या चौक्यांना आणि गावांना निशाण्यावर घेतले. गोळीबार करत पाकिस्तानी सैन्याने शस्रसंधीचे उल्लंघन केले.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाने (BSF) या हल्ल्याला योग्य प्रत्यूत्तर देत गोळीबार केला. हिरानगर सेक्टरमध्ये चकरा गावात सकाळी जवळपास ४.०० वाजता ही चकमक घडली. जवळपास अडीच तास ही चकमक सुरू होती.या चकमकीत भारतीय सैन्यातील कोणीही जखमी झालेले नाही. पाकिस्तानकडून तोफगोळेही झाडले गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी, पुँछ जिल्ह्यातील शाहपूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एका स्थानिक ग्रामीण रहिवाशाचा मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले होते. त्यानंतर आजदेखील (शनिवारी) पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121