काश्मीर खोऱ्यात अफवांचा धुडगूस ; इंटरनेट सेवा बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2020
Total Views |

internet stopped _1 



श्रीनगर
: हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर काश्मीरमध्ये बुधवारी रात्री उशिरा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. काश्मीरचे आयुक्त बशीर अहमद खान यांनी सांगितले की, गिलानी यांचा मुलगा नसीम गिलानी यांनी फोनवर सांगितले की सय्यद अली शाह गिलानी यांना काहीही झालेले नसून त्यांची प्रकृती स्वस्थ आहे तसेच ते घरीच आहेत. स्किम्सच्या डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीची तपासणी केली आहे. या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे ही खान म्हणाले. लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये असे आवाहन केले आहे. अफवा पसरविण्यावर पोलिसांचे लक्ष आहे, अशा घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.



यापूर्वी रविवारी आणि मंगळवारी अफझल गुरू आणि मकबूल बट यांच्या हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. २ आणि ३ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये अफवांनी धुडगूस घातला होता. अशा अफवा पसरवून काश्मीर खोऱ्यातील वातावरण खराब करण्याचे षडयंत्र अराजकवाद्यांकडून सातत्याने केले जात आहे. या सर्व परिस्थिती लक्षात घेता पोलिस व अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अफवा पसरविणाऱ्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न होत आहे. ३ जानेवारी रोजी दहशतवादी नेता रियाज नायकू याच्या अटकेच्या अफवा पसरल्या जात होत्या. यावर लोकांनी फोनवर संपर्क साधण्यास सुरवात केली. सुरक्षा यंत्रणाही सावध झाल्या. अफवांचे स्रोत शोधले जात आहेत.



अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले


मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दुपारी फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या मृत्यूची अफवा पसरली. यात असे म्हंटले होते की, मृत्यूनंतर शहर व आसपासच्या भागात सुरक्षा वाढविण्यात येत आहे जेणेकरून कोणतीही अनुचित प्रकार घडू नये. खोऱ्यात एसएमएस सेवा सुरू होताच डीजीपी दिलबागसिंग यांनी अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. पोलिस आणि अन्य सुरक्षा एजन्सी अफवा पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत.
@@AUTHORINFO_V1@@