मदतीचा ध्यास ‘साई’ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

sai shelar_1  H


कोरोनामुळे गाव, शहर, काम आणि दाम सारेच बंद झाले. एकीकडे रोजगार नसल्याने उपासमार, तर दुसरीकडे नियतीशी लढताना अनेकांचे श्वास बंद झाले. काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. या सगळ्यांना मदतीचा हात दिला तो भाजपचे प्रभाग क्रमांक ४६ चे माजी नगरसेवक स्नेहल (साई) शेलार यांनी दिला. दातृत्व हाच त्यांचा ध्यास असल्याने त्यांनी सर्व नागरिकांना वैयक्तिक मदत केली. कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा.


स्नेहल (साई) शिवाजी शेलार
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी युवा मोर्चा अध्यक्ष, माजी सभापती,माजी नगरसेवक
प्रभाग क्र. : ४६
संपर्क क्र. : ९९३०१४३८८८


कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा फटका गरीब, मजूर, कामगार आणि रोजंदारीवर काम करणार्‍या सगळ्यांनाच बसला. या सर्वांसाठी शेलार यांनी एक महिना पुरेल एवढे अन्नधान्यवाटप केले. प्रभागातील भोईरवाडी, त्रिमूर्तीनगर आणि आरबीटी शाळा परिसरातील सुमारे ५०० लोकांना त्यांनी अन्नधान्य वाटप केले. काही नागरिकांना केवळ अन्नधान्य देऊन, इतर सामान खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना रेशनकिट देता येत नव्हते. अशा नागरिकांसाठी अन्नवाटप करण्यात आले. हे गरजू येऊन दोन्ही वेळेच्या जेवणासाठी लागणारे अन्न घेऊन जात होते. खंबाळपाडा आणि भोईरवाडी या परिसरात सुमारे ३०० नागरिकांना दोन महिने अन्नवाटप केले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभागातील प्रत्येक घरात मास्कचे वाटप केले. शेलार यांच्या प्रभागात अंदाजे १२५ सोसायट्या आहेत. त्या सोसायट्यांमधील सुमारे दहा हजार कुटुंबांना त्यांनी मास्कचे वाटप केले. लोकांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहावी, याकरिता प्रतिकारशक्तिवर्धक औषधवाटपाचा उपक्रमही त्यांनी राबविला. त्यानुसार साडेचार ते पाच हजार कुटुंबांना ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथिक गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले.



कोरोना संशयितांची ओळख पटविण्यासाठी शेलार यांनी खासगी रुग्णालयात ‘अ‍ॅन्टिजेन चाचणी’ शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातून १२५ जणांनी आपली चाचणी करून घेतली. त्यात २० ते २५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. कोरोना रुग्ण आढळल्यास त्या सोसायटीत जंतुनाशक फवारणी ते करून घेत असत. याशिवाय आपल्या प्रभागातील परिसर रोगराईमुक्त, विषाणुमुक्त ठेवण्यासाठी शेलार यांनी जंतुनाशक फवारणी करून घेतली. संपूर्ण प्रभागात महिन्यातून चार वेळा जंतुनाशक फवारणी करीत असत. हे काम आजही सुरू आहे. अनेक मजूर रोजगार नसल्याने आपले गाव गाठण्यासाठी पायी निघाले होते. त्यांच्यासाठी रेल्वे सोडावी, अशी मागणी शेलार यांनी केली होती. तसेच प्रभागातील चांद्यापासून बांद्यापर्यंत जाणार्‍या नागरिकांसाठी विनामूल्य सहा बसेसची व्यवस्था केली होती. या बसमधून नागरिकांनी आपले गाव गाठले. या सेवाकार्यात साई शेलार यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली. सेवाकार्याची परंपराच घरात असल्याने त्यांचे आजोबा गंगाराम शेलार यांची साथ आणि मार्गदर्शनही मिळाले. साई शेलार हे ‘कोविड’काळात गरजूंच्या मदतीसाठी पूर्ण काळजी घेऊन घराबाहेर पडत होते. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण होऊ शकते, अशी शक्यता असतानाही त्यांना कधीही कुणी अडविले नाही. त्यांच्या घरात वयोवृद्ध आजोबा आणि लहान मुलगी असल्याने त्यांना काळजी घेणे भाग होते. साई शेलार यांच्या पत्नी स्वरा, आई शिल्पा, आजोबा गंगाराम, सिद्धार्थ यांनी पाठिंबा दिल्यानेच त्यांना हे काम करता आले. सुदैवाने साई शेलार आणि त्यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे शेलार यांच्या कामात कोणताही अडथळा आला नाही.


sai shelar_1  H


कोरोनामुळे आज प्रत्येक नागरिक आर्थिक संकटांना तोंड देत आहे. फक्त फरक एवढाच की, कोणी कमी, तर कुणी जास्त प्रमाणात यात भरडला जात आहे. ज्यांच्याकडे समाजाला देण्याची क्षमता आहे, त्यांनी ते समाजाला द्यावे. प्रत्येक अडल्या-नडलेल्यांची मदत करावी. समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते दान करावे. कारण, शेवटी दानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे.


शेलार यांनी या सर्व कामासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च केले आहेत. हे सर्व पैसे त्यांनी वैयक्तिकरीत्या खर्च केले. त्यासाठी कोणत्याही प्रायोजकांची मदत घेतली नाही. कोणतेही काम प्रत्यक्षात आणताना मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. शेलार यांच्या पंखांना बळ देण्यासाठी ओमसाई शिव मित्रमंडळ, चॅम्पियन बॉईज साई श्रद्धा क्रिकेट संघ, ग्रामविकास मित्रमंडळ, महिला मंडळ, स्व. शिवाजीदादा शेलार मित्रमंडळ यांनी मदत केली. शेलार यांना या सगळ्या कामात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे चांगले सहकार्य लाभले. शेलार यांना या आपल्या सेवाकार्यात त्यांच्या सहकार्‍यांनी मोलाची साथ दिली. त्यात चिंतामणी पाटील, विशाल गणेश शेलार, विनायक तानाजी गायकवाड, अक्षय शेलार, शेखर शर्मा, श्रीकांत मराठे, नितेश शेलार, दिलीप भंडारी, सागर भोईर, विरू भोईर, ज्ञानेश्वर मुठे, गणेश पाटील, दीपेश पाटील, निलेश पाटील, स्वप्निल असोदेकर, राजू शेख, विजय शेलार, जैन शेलार, विश्वास शेलार, निलेश शेलार, विजय नायडू आणि अमित मालेकर यांचा सहभाग उल्लेखनीय होता. कोरोनाकाळात सेवाकार्य करताना शेलार यांच्या दोन कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली. या कार्यकर्त्यांना योग्य उपचार मिळत आहे की नाही, यांची शेलार कायम चौकशी करीत होते. त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे का, तेही त्यांनी पाहिले. योग्य उपचार, डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि शेलार यांनी आपुलकीने केलेली चौकशी यांच्या बळावर या कार्यकर्त्यांनी कोरोनाची लढाई जिंकली. कार्यकर्ते काम करताना पक्षपातळीवर वरिष्ठांचे सहकार्य व मार्गदर्शन अत्यावश्यक असते. तसे ते साई शेलार यांनाही मिळाले. भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप कार्यकर्त्यांनीही मार्गदर्शन केले व सेवाकार्याचा हा यज्ञ सतत सुरू राहिला.
कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार बुडाला होता. दोन वेळेच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला होता. वाहतूक व्यवस्थाही बंद असल्याने अनेकांनी आपले गाव गाठण्यासाठी पायी प्रवास सुरू केला होता. निदान गावी जाऊन शेती करून दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न तरी मिटविता येईल, या भावनेने अनेक मजूर पायी गावी चालत निघाले होते. असेच एक मजूर कुटुंब शेलार यांच्या दृष्टीस पडले. एक वर्षाची आणि दोन वर्षांची अशा लहान मुलांना घेऊन एक कुटुंब आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करीत होते. या कुटुंबाकडे पाहून शेलार भावनिक झाले. त्यांनी या कुटुंबाची विचारपूस केली. त्यांना खाण्या-पिण्यासाठी आणि गावी जाण्यासाठी काही पैसे दिले. कोरोनाकाळ अजूनही संपलेला नाही. त्यामुळे त्यांचे मदतकार्य अजूनही सुरूच आहे. शेलार यांनी कामाची कोणतीही दिशा ठरविली नाही. गरजूंना जशी मदत लागेल, तशी ते मदत करणार आहेत. गरजूंनीही आतापर्यंत केलेल्या त्यांच्या मदतकार्याला चांगला प्रतिसाद दिला. गरजूंकडून कुठेही नियमांचे उल्लघंन करण्यात आले नाही. नागरिकांनी मदत घेतानाही शिस्तबद्ध पद्धतीने आणि शासकीय नियमांचे पालन करूनच घेतली. नागरिकांनी शेलार यांच्या कामाचे कौतुकच केले.


- जान्हवी मौर्ये 
@@AUTHORINFO_V1@@