'कोव्हीशिल्ड' तिसऱ्या टप्प्यात; तातडीच्या परवानगीसाठी अर्ज दाखल
मुंबई: कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादन केलेल्या कोव्हीशिल्ड लसीची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि अशातच आता लहान मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या न्यूमोनिया आजारावरील 'न्यूमोसिल' लसीला अधिकृत मान्यता मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत ही लस रुग्णसेवेत दाखल सुद्धा झालेली आहे.
जगभरात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण हे 'न्युमोनिया' या आजारामुळे आहे. आजवर लहान मुलांना न्युमोनियावर दिली जाणारी प्रतिबंधित लस ही परदेशातून आयात करत असल्यामुळे सर्वच बालकांना ती देणे शक्य नव्हते. ज्यामुळे जगभरात न्युमोनियामुळे मृत्यू होणऱ्या बालकांच्या मृत्यूसंखेत २० % मुले भारतीय असत. परंतु आता मात्र सीरम इन्स्टिट्यूटने संपूर्ण भारतीय बनावटीची 'न्यूमोसिल' ही लस तयार केली आहे. ज्यामुळे आता भारतासह जगभरातील न्युमोनियामुळे मृत्यू होणऱ्या बालकांच्या संखेत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे म्य्ख्या कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच संपूर्ण जगाचे लक्ष वधलेली कोव्हीशिल्ड लस सुद्धा डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. कारण, सध्या कोव्हीशिल्ड लसीची तिसरी चाचणी होऊन तिचे विस्तृत अहवाल आता डीसिजीआय कडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती सुद्धा पूनावाला यांनी दिली.