आघाडीला सुरूंग - ठाण्यातही काँग्रेसचा स्वबळाचा नारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |

Thane Congress_1 &nb
 
ठाणे : तीन पक्षांची महाविकास आघाडी करून भाजपला टक्कर देण्याचे मनसुबे आघाडीतील मित्रपक्ष रचत असताना काँग्रेसने मात्र आगामी निवडणुकीसाठी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीला सुरूंग लागला आहे. आधी मुंबईत स्वबळावर लढण्याचे संकेत कॉंग्रेसच्या भाई जगताप यांनी दिले असतानाच ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनीही ठाणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याचा इरादा जाहीर करून शिवसेना आणि राष्ट्रवादीची गोची केली आहे.
 
 
 
रसातळाला गेलेल्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी श्रेष्ठींकडुन राज्याराज्यातील कॉंग्रेसची भाकरी फिरवण्याचे प्रयोग केले जात असतानाच काँग्रेसला स्वबळाच्या लढाईचे स्फुरण चढले आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या 'ठाणे' शहरात आजघडीला काँग्रेसचे अवघे तीनच नगरसेवक आहेत. तर, ठाणे महापालिकेत शिवसेनेची एक हाती सत्ता असुन भाजपशी फारकत घेतल्यानंतर सेनेचे राष्ट्रवादीशी बऱ्यापैकी सूत जूळले आहे.
 
 
 
या पाश्र्वभूमीवर,काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अॅड. चव्हाण यांनी कंबर कसली असुन सरकारमधील मित्रपक्षांना 'दे धक्का' देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार,आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले असुन काँग्रेस ठाण्यातील सर्वच्या सर्व १३१ जागा लढण्याचा निर्धार अॅड. चव्हाण यांनी बोलुन दाखवला आहे. कॉंग्रेसच्या या पवित्र्याने महाविकास आघाडीत बिघाडी होऊन तिघांचे भांडण अन चौथ्याचा (भाजपचा) लाभ होण्याची शक्यता राजकिय धुरीण वर्तवित आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@