"पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या 'दिशेला' जाताना जीन्स घालावी;सरकारी कामकाजात नव्हे"
- आचार्य तुषार भोसले.
मुंबई: राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकताच केलेल्या ड्रेसकोडच्या निर्णयावरून आचार्य तुषार भोसलेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना ट्विटरवरून टोला लगावला. "अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पोशाखाबाबत राज्य शासनाने नुकताच घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे.पण हा निर्णय शासकीय यंत्रणांचे प्रमुख असलेल्या मंत्र्यांना सुद्धा बंधनकारक असावा. पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या 'दिशेला' जाताना जीन्स घालावी; सरकारी कामकाजात नव्हे" असे म्हणत ट्विट केले.
'भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्रचे' प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आदित्य ठाकरेंचे दौऱ्यावर जाताना जीन्स परिधान केली असल्याचे फोटोसुद्धा यावेळी पोस्ट केलेले आहेत. आणि आदित्य ठाकरे यांना टॅग करत तुषार भोसले यांनी टोमणा मारला.
सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी जिन्स किंवा टी-शर्ट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयातील पोशाखाबाबत सरकारने नवी मार्गदर्शिका लागू केली आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये काम करणार्या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ड्रेस कोड मार्गदर्शिका असणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचारी वर्गात काहीशी नाराजी असली तरीही सर्वसामान्यांनी मात्र, या निर्णयाचे स्वागत केली आहे.