हिंदूविरोधी प्रपोगंडा पसरवणारी 'तनिष्क'ची दुसरी जाहिरात वादात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |
tanisq_1  H x W


'दिवाळी आहे की 'किटी पार्टी' ? , नेटीझन्सचा प्रश्न

 
मुंबई : 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातीनंतर तनिष्कची आणखी एक जाहिरात वादात सापडली आहे. हिंदूविरोधी प्रपोगंडा पसरवण्याच्या आरोपामुळे ही वादग्रस्त जाहिरात तनिष्कने पुन्हा मागे घेतली आहे. दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल 'उपदेश' देणाऱ्या मैत्रिणी एकत्र येतात मात्र, प्रथा परंपरेचा पडलेला विसर अनेकांनी त्यांना निदर्शनास आणून दिला. दिवाळी म्हणजे केवळ 'किटी पार्टी' किंवा 'गेट टुगेदर' नव्हे, याची जाणीव अनेक नेटीझन्सनी या ज्वेलरी ब्रॅण्डला करून दिली. पूर्वीप्रमाणेच तनिष्कने ही जाहीरातही मागे घेतली मात्र, आणि पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले.
 
 
जाहिरातीत आक्षेपार्ह काय ?
 
'तनिष्क'च्या जाहिरातीत दिवाळीनिमित्त काही स्त्री पात्रे एकत्र येत आली आहेत. हल्क्या रंगाच्या साड्यांचा श्रृंगार केला आहे. तनिष्कच्या दागिने परिधान करून दिवाळीत काय काय केले जाऊ शकते याबद्दल चर्चा करत आहेत. पारंपारिक श्रृंगाराच्या नावाखाली फक्त दागिनेच दिसत आहेत. ना कपाळावर कुंकू ना दिवाळीची कुठलीही पूजा किंवा तयारी, ना घरासमोरची रांगोळी ना पणती. नेमका याच गोष्टींना नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला. पण ज्यावेळी फटाके फोडू नका सांगायची वेळ येते त्या गोष्टींवर सर्वजणी ठाम असतात.
 
 
 
ना लक्ष्मीपूजन, ना कंदील ना आणखी काही पूजेची आरास, ही जाहिरात पाहणाऱ्यांना खटकली. हिंदूविरोधी प्रपोगंडा तयार करून सण कसे साजरे करावेत, असा प्रपोगंडा चालवला जात असल्याचा आरोप 'तनिष्क'वर झाला. जाहिरात सुरू होते. "निश्चितच कुठलेही फटाके फोडणार नाही, आणि कुणी फोडूही नयेत.", असा 'उपदेश' या जाहिरातीतून दिला जातो. यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला.
 

tanisq_1  H x W 
 
 
 
हिंदू सणांचे इस्लामिकरण ?
 
काहींनी हा प्रकार हिंदू सणांचे इस्लामिकरण करण्याची आणि प्रपोगंडा चालवण्याची ही पद्धत आहे, असे म्हटले. हिंदूंच्या सणांमध्ये विना कुंकू लावून स्त्रीया का दिसत आहेत. पूजेची थाळी कुठे आहे, कुठल्याही देवाचा उल्लेख का नाही, कुठल्या आधारे ही दिवाळीची जाहिरात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
 
विक्री वाढवण्यासाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न !
 
यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या ५५ सेकंदाच्या जाहिरातीमुळे 'तनिष्क'वर चौफेर टीका झाली. वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या, टिव्ही चॅनल्सवर चर्चासत्रे भरवण्यात आली. याशिवाय नेटीझन्सनी सोशल मीडियावर #boycottanishq ही मोहिम उभी केली. त्यात दोन्ही बाजूंनी वादविवाद झाला. याचा फायदा कंपनीला झाला. कंपनीने जाहिरात माफी मागत मागे घेतली मात्र, कंपनीच्या व्यवहारांवर त्याचा प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. चर्चेत राहण्यासाठी 'तनिष्क', असे वाद उकरून काढत नाही ना, असा प्रश्न आता विचारला जात आहे.



@@AUTHORINFO_V1@@