रियाला त्रास देऊ नका,तिची सुटका करा : कॉंग्रेस नेत्याची मागणी

    05-Oct-2020
Total Views | 37

Rhea Chakravarti_1 &
 
 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली, त्याची हत्या झाली नाही हे एम्सच्या अहवालानंतर सिद्ध झाले आहे. मात्र, त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला त्रास देऊ नका. तिची त्वरित तुरुंगातून सुटका करा, अशी अजब मागणी कॉंग्रेसचे लोकसभेतले नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. एनसीबीने रिया आणि तिचा भाऊ शौविकला ड्रग्स प्रकरणात अटक केली होती.
 
 
 
अभिनेता सुशांतसिंगची मैत्रीण रिया ही त्याला ड्रग्ज पुरवत होती असे एनसीबीच्या तपासात आढळून आल्याने कारवाई करत तिला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एम्सच्या अहवालाने त्याने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले. मात्र, बॉलीवूडभोवती असलेले ड्रग्सचे जाळे सर्वांसमोर आले. यामध्ये अनेक बडे कलाकार अडकले असून अद्यापही याबाबत एनसीबीचे चौकशी सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग आणि सारा आली खान यांचीदेखील चौकशी करण्यात आली होती.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121