फडणवीसांनी शब्द पाळला ; कोरोना उपचारांसाठी फडणवीस सेंट जॉर्जमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2020
Total Views |

Devendra Fadanvis_1 


मुंबई :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर, गिरीश महाजन यांच्याशी बोलताना, त्यांनी कोरोनाची लागण झाल्यास मला सरकारी रुग्णालयात दाखल कर, असे म्हटले होते. फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.


'गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं होते. फडणवीस यांचे शब्द ऐकताच महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि काय बोलावं हेच त्यांना सुचेनासं झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही नेटीझन्सकडून फडणवीसांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देण्यात येत आहे. तसेच, सरकारी रुग्णालयात ते उपचार घेणार का, असा प्रश्नही काही जणांकडून विचारण्यात आला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सेंट जॉर्ज हे सरकारी रुग्णालय आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे फडणवीसांनी ट्विट केले आहे.

कोरोना कालावधीत फडणवीसांचे दौरे

राज्यातील कोरोना परिस्थिती, रुग्णांलयामध्ये मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून राज्यभर फिरत आहेत. या माध्यमातून ते पालिका आणि आरोग्य प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोविड रुग्णालयांना भेटी देऊन ते स्वत: परिस्थितीची पाहणी करत होते फडणवीस यांच्या दौऱ्यांची संख्या पाहता त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाटत आहे. म्हणून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करून ही सूचना दिली
@@AUTHORINFO_V1@@