राज्यातील जिमसाठी साधला दसऱ्याचा मुहूर्त ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2020
Total Views |

gym_1  H x W: 0


मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या जिम आणि फिटनेस सेंटर्स अखेर उघडणार आहेत. २५ ऑक्टोबरपासून म्हणजे दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्स उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि उपायांचे सक्तीचे पालन करूनच जिम, व्यायमशाळा आणि फिटनेस सेंटर उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे सांगतानाच झुम्बा, स्टिम आणि सौना बाथ सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाहीही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामुहीक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.


उपचारांसाठी आपण मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या आहेत. आता रुग्ण कमी होण्यामुळे रुग्णशय्या रिकाम्या राहू लागल्या आहेत. त्या रिकाम्याच रहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, करोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास,आहे त्या सुविधांवरही अचानक ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. संसर्ग वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण जीम, व्यायामशाळांसाठी ‘एसओपी’ तयार केली आहे आणि तिचे पालन होणे आवश्यक आहे. या 'एसओपी'चे पालन करण्याची जबाबदारी जीम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या 'एसओपी'चे काटेकोरपणे पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
@@AUTHORINFO_V1@@