दीपिका, सारा, श्रद्धाची सुटका इतक्यात नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020
Total Views |

DSS_1  H x W: 0
 
मुंबई : बॉलीवूड ड्रग्स प्रकरणामध्ये बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची अंमलबजावणी विभागाने चौकशी केली. यामध्ये अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याची चर्चा आहे. मात्र, या तीनही अभिनेत्रींची अद्यापही सुटका झालेली नाही , असे एनसीबीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या तिघींची नावे ड्रग्स प्रकरणात असल्यामुळे मोठमोठ्या ब्रॅंडसची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
 
 
सध्या दीपिका, सारा आणि श्रद्धा या कलाकारांची नावे सध्या काही आरोपांमध्ये डागाळली आहे. त्यामुळे यांच्या जाहिराती चालवायच्या की नाही यावर अनेक मोठे ब्रॅंड विचार करत आहेत. यामध्ये २०१९च्या हवाल्यानुसार एकट्या दीपिकावर तब्बल १९ मोठे ब्रॅंड अवलंबून आहेत. यात ब्रिटानिया, तनिष्क, एक्सिस बॅंक, ओप्पो, विस्तारा एअरलाईन्स आदी ब्रॅंडसचा समावेश होतो. आता या सर्वच ब्रॅंडसची गोची झाली आहे. दीपिकावर या ब्रॅंडस मिळून सध्या ६०० कोटी रुपये लागले आहेत. तर श्रद्धा कपूरही अनेक मोठे ब्रॅंड्स बाळगून आहे. या सर्व ब्रॅंडसने यांच्या जाहिरातींचे प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
“कंपन्यानी जाहिराती थांबवणे हे स्वाभाविक आहे. कारण, हे त्या त्या ब्रॅंडचे दूत असतात. त्यांची इमेज डागाळली तर ब्रॅंड याचा विचार करतात. आमीर खाननेही काही वर्षांपूर्वी भारतात राहणे योग्य नसल्याचे विधान केल्यावर एका मोठ्या ग्राहक कंपनीने आमीरच्या जाहिराती थांबवल्या होत्या. उद्या कदाचित यातून हे कलाकार बरी होऊन सुटले तर उद्या या जाहिराती पुन्हा सुरू होतील. जर यातल्या काही कलाकार यात दोषी आढळल्या तर मात्र त्यांना मोठे नुकसान भोगावे लागेल.” अशी प्रतिक्रिया जाहिरातदार तज्ञांकडून देण्यात येत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@