पुणे : भारतीय लष्कराच्या पुणे येथील सदर्न कमांडचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी पदभार स्विकारला. पुणे येथील वॉर मेमोरिअल येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी शहीद शूर जवानांना आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (आरआयएमसी), देहरादून आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी लेफ्टनंट जनरल मोहंती हे १९८२ च्या राजपूत रेजिमेंटचे बॅचचे इन्फंट्री अधिकारी आहेत आणि सध्या ते रेजिमेंटचे कर्नल देखील आहेत.
रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये मल्टी नॅशनल ब्रिगेड संभाळण्यासोबतच त्यांनी सेशेल्स सरकारचा लष्करी सल्लागार म्हणून काम देखील पहिले आहे. एमफिल आणि व्यवस्थापन पदवीधारक असलेले मोहंती यांनी चीन, दक्षिण आशिया आणि उत्तरपूर्व भारत याप्रदेशांत होणाऱ्या कारवायांवर त्यांनी संशोधन केले त्यांच्या या अभ्यास्मुळे त्यांना या खेत्राचे तज्ज्ञ म्हंटले हाते.