मुंबई : मोर्चा काढण्याआधी जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे द्या, असे आवाहन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी उबाठा गटाच्या वतीने सरकराच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "उबाठा गट आणि उद्धव ठाकरे आज महायूती सरकारच्या विरोधात मोर्चा काढताहेत. त्यांनी मोर्चा काढण्यासोबतच जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले, ही जबाबदारी कुणाची? याच कोरोनाकाळात खिचडी घोटाळा किंवा बॉडीबॅग असे अनेक घोटाळेही झालेत. याला जबाबदार कोण? त्याकाळात असंख्य प्रश्न असतानाही आपण अडीच वर्षांच्या कार्यकाळात किती वेळा मंत्रालयाची पायरी चढलात? नियमित मंत्रालयात का गेले नाहीत? या प्रश्नांची उत्तरेदेखील उद्धव ठाकरेंनी द्यावी आणि मगच मोर्चाचे नेतृत्व करावे," असे ते म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....