नव्या वर्षात इस्रोचे यशस्वी उड्डाण : जीसॅट ३० चे पहिले प्रक्षेपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) या वर्षातील पहिले यशस्वी प्रक्षेपण केले. फ्रान्सच्या अरिआन लॉन्च पॅड कॉम्प्लेक्स येथून जीसॅट ३० या उच्च शक्ती असलेल्या टेलीकम्युनिकेशन उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. ३८ मिनीटांनंतर हा उपग्रह अंतराळातील जीओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या दाखल झाला. यामुळे इंटरनेट सेवेला मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

 
 
 

जीसॅट हा 'हाय पॉवर' उपग्रह असून याद्वारे टेलिव्हीजन, टेलिकम्युनिकेशन, आणि अन्य प्रक्षेपण सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच दूरसंचार सेवेत मोठी क्रांती होणार आहे. जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्व तटाजवळील कैरो बेटावरून यशस्वी प्रक्षेपण केले आहे. शुक्रवारी पहाटे २.३५ वाजता उपग्रहाचे फ्रान्सच्या हद्दीतील बेटावरून हा उपग्रह सोडण्यात आला आहे. इस्रोच्या इनसॅट/जीसॅट श्रेणीतील या उपग्रहाने १२सी आणि १२ केयु बँड ट्रान्सपॉन्डर्ससह प्रक्षेपण केले.

@@AUTHORINFO_V1@@