किड्यामुंग्यांसारखेही नको...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020   
Total Views |


bahuraddin ajmal_1 &



बद्रुद्दीन यांचा धर्म इस्लाम आहे, पण त्यांना तर कुणी किड्यामुंगीसारखी वागणूक दिली नाही. भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांच्याही सर्वंकष उत्कर्षाचा विचार केला जातो. मुस्लिम भगिनिंना माणूसपण देणारे ‘तिहेरी तलाक’विरूद्ध कायदा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.



भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांना माणसांसारखी वागणूक दिली जात नाही. त्यांना किड्यामुंग्यांसारखी वागणूक दिली जात आहे,” असा आरोप ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे (एआययुडीएफ) प्रमुख आणि लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी केला. बद्रुद्दीन यांचा धर्म इस्लाम आहे, पण त्यांना तर कुणी किड्यामुंगीसारखी वागणूक दिली नाही. भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांच्याही सर्वंकष उत्कर्षाचा विचार केला जातो. मुस्लिम भगिनिंना माणूसपण देणारे ‘तिहेरी तलाक’विरूद्ध कायदा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.



‘मुस्लिमांना या देशात राहण्याची भीती वाटते,’ हे वाक्य काही ठराविक लोक दररोज बडबडतात. पण, खरेच असे काही आहे का? मुस्लिमांना देशात भीती वाटत असती, त्रास झाला असता, तर त्यांनी रोहिंग्या आणि इतर देशातील मुस्लिमांनाही देशात येऊ द्या, असे म्हटले असते का? आम्ही मरतोय. या या तुम्ही पण मरा, असे कुणी आपल्याच धर्मबांधवांना म्हणणार नाही. याचाच अर्थ मुस्लिमांना या देशात भारतीय माणसासारखीच वागणूक मिळते. ते खुश आहेत म्हणूनच तर त्यांना वाटते की, आपल्यासारखी खुशी जगभरातल्या मुस्लिमांनाही मिळू दे. दुसरीकडे आपण पाहतो की, ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ कायद्याला विरोध करताना मुस्लीम मोर्चामध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना शिव्या देणारे, हिंदू धर्माचा भयंकर अपमान करणारे, देशाचे तुकडे पाडण्याचा मनसुबा असणारे इतकेच काय ‘काश्मीरला मुक्त करा,’ असा संदेश देणारे बॅनरही काही मूर्ख लोकांच्या हातात पाहिले.



हे सगळे घाबरण्याचे लक्षण आहे का
? जर या सगळ्यांना किड्या-मुंग्यांसारखी वागणूक असती तर हे सगळी थेरं करण्याची हिंमत त्यांच्यात असती का? नाहीच. सगळेच नाहीत पण बद्रुद्दीन अजमलसारखे लोक ‘मुस्लीम कार्ड’ वापरून देशाला बदनाम करतात. किड्या-मुंगीसारखे जगणे काय असते, हे बद्रुद्दीन यांनी इतर मुस्लीम देशांत जाऊन पाहावे. बद्रुद्दीनसारख्या लबाडांना माहिती असते की, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आपले सगळे विकृत, देशविघातक प्रवृत्तीचे लाड भारतातच पुरवले जातील, इतरत्र नाही. किड्यामुंग्यांना तरी थोडी नीतीमत्ता असते पण यांना तीही नाही. त्यामुळे या अशा लोकांना किड्यामुंग्यांसारखीही वागणूक मिळू नये. आमेन...



एक हौस पुरवा महाराज
...

‘गांधी शांती यात्रा’ मी काढली. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनवा, अशी इच्छा असलेले शरद पवार यांनीच तर यात्रेचा शुभारंभ केला. मी तर मनात ठरवले पण की, २०२४साली मी यशवंत सिन्हा पंतप्रधान आणि शरद पवार राष्ट्रपती... (कुणाला सांगू नका, मला असे वाटते ते. नाहीतर सगळे मिळून माझाच पत्ता कट करायचे.) तर, आम्ही सगळे एक झालो, ते नरेंद्र मोदींच्या विरोधात. आमच्यासमोरचा माणूस पंतप्रधान होतो म्हणजे काय? मला पण पंतप्रधान व्हायचे होते, पण सगळं जग नरेंद्र मोदींचाच उदोउदो करते. जळून जळून आमची राख व्हायची वेळ आली. म्हणूनच आम्ही सगळे जळकुकडे एकत्र आलो आणि मग ही यात्रा काढली ‘गांधी शांती यात्रा.’

आता या यात्रेचे नाव ‘गांधी शांती यात्रा’ यासाठी की, आपल्या देशात संविधान आणि गांधीजी या दोघांचे नाव घेतले की, सगळे सोपे होते. ‘संविधान बचाव’ म्हणत संविधानयुक्त कायद्यांना विरोध करणे, निर्णयांना विरोध करणे, कायदा-सुव्यवस्था व्यवस्थितपणे मोडणे, हे सगळे करत असताना तोंडाने ‘संविधान बचाव, संविधान बचाव’,असे बरळले की झाले! आपण काहीही करायला मोकळे. त्यामुळे मीसुद्धा या यात्रेचे उद्दिष्ट ‘संविधान बचाव’ हेच ठेवले आहे. तसेच गांधीजींचेही आहे. गांधीजींच्या अहिंसेचे नाव घेतले की, आपण हिंसा करायला मोकळे! आता काही लोक टीका करतात की, मी तर गांधींच्या विचारांच्या विरोधात बोलतो, करतो. जसे झारखंडमध्ये वीज आंदोलन करताना कायदा हातात घेऊन वीज अधिकार्‍यांना बांधून ठेवले, त्यांच्यावर अत्याचार केले. मागे गोहत्या करणार्‍याचा खून झाला. त्या हत्येचे संशयित आरोपी जामिनावर सुटले, तेव्हा ते पहिल्यांदा माझ्याच घरी आले होते. जामिनावर सुटले म्हणून मी त्यांचे अभिनंदनही केले होते. बरोबर आहे हे. मी असाच आहे. २०१३साली मीच म्हटले होते ना की, नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, तसेच काँग्रेसलाही पूर्वी मी बरेच शिव्याशाप दिलेत. २०१८साली भाजपने आपला वचननामा पूर्ण का करत नाही म्हणत मी भाजप सोडले, तर आता भाजप सगळे वचन पूर्ण करत सुटले. असो, आता देशाला वाचवायचे आहे, त्यासाठी तुम्ही फक्त एकदा तरी म्हणा की, पंतप्रधान यशंवत सिन्हाच होणार. फक्त एकदा मनात तरी म्हणा हो, एक हौस पुरवा महाराज!

@@AUTHORINFO_V1@@