मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही कोणती दडपशाही : केशव उपाध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |
ut _1  H x W: 0


विचार स्वातंत्र्याचे गुणगान गाणारे आता मात्र गप्प का?

मुंबई : "विचार स्वातंत्र्याचे गुणगान गाणारे आता मात्र गप्प का? एका पत्रकारांवर साहित्य संमेलनात हा प्रसंग ओढावतो, ही कोणती दडपशाही आहे", असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात दैनिक'मुंबई तरुण भारत'चे वार्ताहर सोमेश कोलगे यांच्या अटकेचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

पोलीस उपनिरिक्षक माने यांनी 'मुंबई तरुण भारत'च्या स्टॉलवर येत सोमेश कोलगे यांना तेथून दूर नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबद्दल केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. या प्रकाराबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

राज्यसभा खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनीही या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या राज्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही स्थिती आहे का?", असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे. तर साहित्य संमेलनात दैनिक मुंबई तरुण भारतच्या प्रतिनिधींशी सोमेश कोलगे यांच्या अटकेचा प्रयत्न हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला नाही का, असा सवाल पत्रकार मृदूला राजवाडे यांनी विचारला आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@