टिपू सुलतान एक्सप्रेसच्या नामांतराची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2019
Total Views |




कर्नाटक
: २०१५ मध्ये कर्नाटकात साजऱ्या  होणाऱ्या टिपू सुलतान जयंतीवर सरकारने बंदी आणली. सरकारच्या मते
, टिपू सुलतान हा एक अत्याचारी आणि हिंदूंचा विरोध करणारा राजा होता. त्यामुळे त्याच्या जयंतीचा उत्सव साजरा करणे चुकीचे आहे. आता सरकारकडे पुन्हा एकदा सुलतान एक्सप्रेसच्या नामांतराची मागणी होत आहे. ही रेल्वे म्हैसूर- बंगळुरू दरम्यान धावते.

 


 

 

विल्यम कर्कपैट्रिकने १८११ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या संदर्भानुसार, ज्यात टिपू सुलतानने लिहिलेली काही पत्रे आहेत, यावरून हे स्पष्ट होते की, टिपूच्या कारकिर्दीत कोट्यवधी हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. हिंदूंचा छळ झाला. या पुस्तकाव्यतिरिक्त, राजा वर्मा, विल्यम लोगान, इतिहासकार एम. ए. गोपालन यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख करून हे सिद्ध झाले आहे. याच मुद्द्याला धरून कर्नाटकातील हिंदू संघटना टिपू सुलतान एक्सप्रेसच्या नामांतराची मागणी सरकारकडे करत आहेत. टिपूचा वारसा इतिहासकारांच्या चर्चेचा विषय बनला आहे. हिंदू जनजागृती समितीने बंगळुरू आणि म्हैसूर यांच्या दरम्यान चालणार्‍या टिपू एक्सप्रेसचे नामकरण कृष्णराज वोडेयार आणि सर एम. विश्वेश्वराय यांच्या नावे करण्याची मागणी केली आहे. या मागणीने आता जोर धरला आहे. आज ट्विटरवरदेखील हा ट्रेंड दिसून आला.







@@AUTHORINFO_V1@@