प्लास्टिकमधून होणार इंधननिर्मित, पुणे महापालिकेचा प्रकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2019
Total Views |

 

 
पुणे : प्लास्टिक कचर्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने इंधननिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या कचर्यावर प्रक्रिया करून त्यामधून इंधननिर्मिती केली जाईल. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयासमोरील कचरा रॅम्पवर चार मेट्रिक टनांचा प्रकल्प उभारण्यात येत असून तो सीएसआर फंडमधून उभा केला जाणार आहे. यातील एका प्रकल्पावर दिवसाला १६०० ते १७०० लिटर इंधननिर्मिती होणार असून वर्षाकाठी साधारणपणे १४६० मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया होईल. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने होणारी पर्यावरणीय हानी मोठी आहे. या कचर्याचा पुनर्वापर करून त्यापासून इंधननिर्मिती करण्यासाठी पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एक मेट्रिक टनाचा प्रकल्प घोले रस्त्यावर उभारला होता.
 

आता या ठिकाणी प्रतिदिन चार मेट्रिक टन प्लास्टिक कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उभारला जात आहे. खासगी कंपनी या प्रकल्पासाठी गुंतवणूक करणार असून पालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. या प्रकल्पातून डिझेल, पेट्रोल, क्रूड ऑईलची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षी निविदा प्रक्रिया राबविली होती. या प्रकल्पासाठी पालिकेला जागा, विद्युत आणि पाण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. विजेचे देयक कंपनीच भरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी गुंतवणूक करावी लागणार असून पालिकेला वर्षाकाठी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

@@AUTHORINFO_V1@@