'रोलींग स्टॅाक मेट्रो'च्या मॅाडेलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

    16-Aug-2019
Total Views | 24

 

 
मुंबई: कुलाबा-वांद्रे-एसईपीझेड कॅारिडोरमधील मेट्रो 3 मधील मेट्रो गाडीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी अनावरण झाले. मेट्रो तीन वरील या मार्गिकेला अॅक्वा लाईन असे नाव देण्यात आले आहे.
 
 

अॅलस्ट्रॅाम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड या कंपनीला मेट्रोच्या डब्यांच्या रचना व निर्मितीचे काम दिले आहे. यावेळी व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “ऑलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडियाच्या श्री सिटी फॅक्टरीत यावर्षी नोव्हेंबरमध्ये गाड्यांचे उत्पादन सुरू होईल आणि एका वर्षाच्या आत पहिल्या ट्रेनचे आगमन अपेक्षित आहे.

 
 

यावेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकत्रित केलेला चार लाख रुपयांचा धनादेश व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, तसेच प्रकल्प संचालक सुबोधकुमार गुप्ता, संचालक (प्रणाली) अजय कुमार भट्ट आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 

या मेट्रोगाडीची काही वैशिष्ट्ये:

 

  • आर्द्रता नियंत्रित करणारे पूर्णपणे वातानुकूलित कोच प्रशिक्षक आत सुरक्षित आणि आरामदायक वातावरण.
  • माहिती, जाहिरात आणि करमणूक यासाठी एलसीडी स्क्रिन.
  • डिजिटल मार्ग, नकाशा सूचक.
  • सहज प्रवासी उतरण्यासाठी प्रवासी घोषणा प्रणाली.
  • उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी आधार, आरामदायी आसन व्यवस्था.
  • दिव्यांगासाठी चाकाच्या खुर्चीसह सामावून घेणारी विशेष आसन व्यवस्था.
  • स्वच्छ आणि सुलभ वायूवीजन व्यवस्था.
  • प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची देखरेख प्रणाली, आगीपासून बचावासाठी स्मोक डिटेक्टर आणि अग्निशामक यंत्र आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्काची व्यवस्था.

 

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121