राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

    13-Aug-2019
Total Views | 22


 


नवी दिल्ली : तब्बल २४ वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये इतिहास घडणार आहे. २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या टी-२० क्रिकेटचा समावेश होणार आहे. या स्पर्धेमध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात २०२२ च्या २७ जुलैपासून होणार आहे. या स्पर्धेच्या १८ क्रीडा प्रकारांमध्ये ४५,००० खेळाडू भाग घेणार आहेत.

 
 
 

महिलांच्या क्रिकेटचे सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळले जाणार असून हे सामने आठ दिवस खेळवले जाणार आहेत. १९९८ नंतर पहिल्यांदा क्रिकेटला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाले आहे. १९९८ मध्ये झालेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने ५० षटकांच्या क्रिकेट प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा फेडरेशनचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी सांगितले की, "आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे परत एकदा स्वागत होत आहे." क्वालालंपूर येथे झालेल्या १९९८ मधील स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. यात जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. महिलांच्या टी-२० क्रिकेट प्रकाराला चांगले बनवण्यासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगले व्यासपीठ आहे. त्यामुळे आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघ बाजी मारतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121