चांद्रयान- २ उद्या चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होणार

    13-Aug-2019
Total Views | 29

 

श्रीहरीकोटा : भारताचे चांद्रयान-२ उद्या पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून २० ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल व ७ सप्टेंबरला ठरल्याप्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल, असे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी सोमवारी येथे सांगितले.
 

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी डॉ. सिवान येथे आले होते. चांद्रयान-२चे ऑर्बिटर’, ‘लॅण्डरआणि रोव्हरहे तिन्ही भाग सुस्थितीत असून सर्व यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

इस्रोचे अध्यक्ष म्हणाले की, "प्रक्षेपण केल्यापासून गेल्या तीन आठवड्यात चांद्रयान-२ची कक्षा आणि मार्ग बदलण्यासाठी एकूण पाच क्रिया केल्या गेल्या. १४ ऑगस्टला पहाटे ३.३० वाजता यापुढील ट्रान्स ल्युनर इंजेक्शनहा महत्वाचा टप्पा पार पाडला जाईल. त्यामुळे हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. चांद्रयान -२ मोहिमेचे उद्दीष्ट मुख्यत: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरविणे हे आहे."

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121