'साहो' चा गेम लॉंच

    31-Jul-2019
Total Views | 84



प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या साहो या चित्रपटाचे वेड प्रेक्षकांवर असतानाच नुकतेच त्यावरील एक गेम देखील लॉंच करत असल्याचे साहोची निर्मिती संस्था असलेल्या युव्ही क्रिकेएशन्सने जाहीर केले. त्याचबरोबर या नवीन गेमचे पोस्टर देखील प्रकाशित केले. अशातर्हेने या गेममुळे चित्रपटाची तर प्रसिद्धी होणारच आहे पण त्याचबरोबर प्रेक्षकांची देखील या गेम विषयी उत्सुकता वाढणार आहे.

सध्या ट्विटरवर या गेमविषयी बरीच चर्चा रंगली असून तो अन्य ट्रेंडिंग विषयांच्या यादीत आला आहे. कालच साहोमधील 'इन्नी सोनी' हे गाणे प्रदर्शित झाले आणि त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आता आज आलेल्या या गेममुळे चित्रपट आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात येणार असे दिसत आहे. आधीच प्रभासच्या चित्रपटातील टेक्नोसॅव्ही लुकला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती आता या गेममध्ये सुद्धा त्याचा चेहरा वापरण्यात आला आहे. सुजीथ दिग्दर्शित 'साहो' हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात ऍक्शन आणि थ्रिलर अशा दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121