मुंबई : पुण्यात कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी आरोपी गौतम नवलखाचे पाकिस्तानातील दहशदवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन संपर्क असल्याचा धक्कादायक आरोप पुणे पोलीसांनी केला आहे. पुणे पोलीसांनी ही माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
या प्रकरणी पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, नवलखा काश्मिर येथील उग्रवादी आणि हिजबुलशी संपर्कात होता. याबद्दल सखोल चौकशी व्हावी म्हणून त्याची सुटका करू नये, अशी विनंती उच्च न्यायालयात पुणे पोलीसांकडून यावेळी करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नवलखा यांच्या कोठडीत आणखी वाढ केली असून त्याची सुरक्षाही वाढवण्याचेही निर्देश दिले आहेत. राज्य सरकारतर्फे अॅडय अरुणा पई आणि नवलखातर्फे अॅड. युग चौधरी यांनी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले.
अरुणा यांनी न्यायालयात पुणे पोलिसांच्या चार्जशीटच्या आधारे सांगितले कि, "कोरेगाव भीमाच्या चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशदवादी संघटनेच्या माध्यमातून माओवाद्यांना हत्यारे पुरवण्याचा आरोप आहे. शहरी नक्षलवाद खटल्यातीलचा आरोपी नवलखा याने मात्र, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्यावर दाखल झालेली प्रकरणे हटवण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने यावर राज्य सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat