'5 G'साठी मुकेश अंबानींचा मास्टरप्लान

    02-Jul-2019
Total Views |




नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रात '5 G' सेवेच्या विस्तारासाठी केंद्र सरकारतर्फे पाऊले उचलली जात असताना आता 'रिलायन्स जिओ' '5 G' क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनीतर्फे ब्रॉडबॅंड सेवा विस्तारासाठी ३ हजार ५०० कोटींचे कर्जाची योजना आखण्यात येणार आहे. गिगाफायबर आणि '5 G' या उत्पादनांसाठी रिलायन्सतर्फे हे कर्ज घेतले जाणार आहे.

 

आशियातील बड्या बॅंकांना यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असून हे कर्ज येत्या पाच वर्षांसाठी घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी रिलायन्सतर्फे १२ हजार ८४० कोटींचे कर्ज घेण्यात आल्याचीही माहीती उघड झाली होती. एका अहवालानुसार, बॅंक ऑफ चायना, सुमितोमो मित्सुई बॅंकींग कॉर्पोरेशन, डेव्हलमेंट बॅंक ऑफ जपान, एचएसबीसी आदी बॅंकांना हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

 

सप्टेंबरमध्ये होणार '5 G' स्पेक्ट्रमचा लिलाव

 

दूरसंचार मंत्रालयाच्या माहीतीनुसार, '5 G' सेवा देणाऱ्या स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा देशातील सर्वात मोठ्या स्पेक्ट्रमचा लिलाव असेल, असे सांगण्यात येत आहे. ३३०० ते ३५०० मेगाहटर्ससाठी स्पेक्ट्रमच्या किमान किमती ठरवण्यात आल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121