मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे अजोय मेहता यांचे निर्देश

    22-Jun-2019
Total Views |


जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घेण्याचेही निर्देश

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. असे असूनही कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे सांगतानाच मुख्य सचिवांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतली.

पाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आर ओ यंत्र बसविले आहेत त्यांची तपासणी मोहीम लगेचच हाती घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा होतो त्यांची देखील तपासणी करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री.सगणे, मंत्रालयातील बांधकाम आणि विद्युत विभागाचे अभियंता, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंत्रालयातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी वसईच्या शिवालयात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर येथील शिवालयात भोळ्या महादेवाच्या पिंडीवर पूजा अर्चा करून जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती.यातील प्राचीन मंदिरांपैकी तुंगार अरण्यातील ईश्वरपुरी च्या निसर्गरम्य आत्मलिंगेश्वर मंदिरात व भालीवली येथील जागृत महादेव वृंदावन टेकडी मंदिरात विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते .याचा लाभ आलेल्या भाविकांनी घेतला.या भंडाऱ्यात उपवासाला चालणारे पदार्थही होते.अगदी संध्याकाळ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121