सोशल मिडियावर 'मिम्स'चा पाऊस !

    23-May-2019
Total Views |


 


राहुल गांधीवर 'मिम्स'व्दारे शेलक्या शब्दात टिका 

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या विजयाचा कल भाजपकडे झुकत असल्याने सोशल मिडीयामध्ये मिम्सचा पाऊस पडत आहे. यामध्ये राहुल गांधी यांची खिल्ली उडविणाऱ्या मिम्सनी धुमाकूळ माजवला आहे. 'सदमावती', 'हारले-जी' असे पोट धरून हसायला भाग पाडणारे मिम्स तयार करून नेटकऱ्यांनी राहुल गांधींना लक्ष केले आहे. याशिवाय 'आता लाव रे तो व्हिडीओ' असे, म्हणाण्यापुरतीच शिल्लक राहिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही मिम्स सोशल मिडीयात शेअर केले जात आहे.


 

२०१९ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी अजूनही सुरू असली तरी मतांचा कल पाहता मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच सोशल मिडीयावर मोदींवरून विरोधकांना हिणवणारे आणि हास्यापद टिप्पणी करणारे मिम्स फिरत आहेत. यमक जुळवून, चित्रपटांचे संवाद टाकून आणि म्हणींचा वापर करुन विरोधकांची त्यातही खास करून राहुल गांधींची खिल्ली उडविणारे मिम्स नेटकऱ्यांनी बनवले आहेत. यात पालेॅ-जी बिस्किटाच्या पाकिटावर राहुल गांधी यांचे चित्र लावून 'पार्ले-जी'चे 'हारले-जी' असे, यमक जुळविण्यात आले आहे. तर भाजपच्या निवडून येणाऱ्या जागा पाहून 'सदमा' बसलेल्या राहुल गांधींना 'सदमावती' अशी उपमा देणारे मिम्स नेटकरी शेअर करत आहेत. यासाठी 'पद्मावती' चित्रपटाच्या पोस्टरवर दिपिका पादुकोणच्या चेहऱ्यावर राहुल गांधीचे छायाचित्र लावून 'सदमावती' म्हणत, त्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे.

 
 

याशिवाय 'यहां भी देखा, वहां भी देखा, अब तो सारे जहां में देखा, क्या ? तेरा ही जलवा' हे गाणे म्हणत मोदींना मिठी मारणारे राहुल गांधीचे मिम्सही पोट धरून हसायला भाग पाडत आहे. जाळ काढणाऱ्या हिरव्या मिरच्यांनी बीजेपी असे लिहून, 'मुझे तो बीजेपी लग रहा हैं....किसिको मिरची लगी तो में क्या करू ' असे, विरोधकांना हिणवणारे मिम्स नेटिझन्सने शेअर करत आहेत. महत्वाचे म्हणजे 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही नेटकऱ्यांनी मिम्सच्या माध्यामातून धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोपटाची उपमा दिल्याप्रमाणे राजे ठाकऱ्यांच्या चेहऱ्यावर पोपटाचे छायाचित्र लावून 'फोड रे तो टिव्ही' असे उपरोधात्मक मिम्स सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121