या क्षेत्रात २०२३ पर्यंत लाखो रोजगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2019
Total Views |





सिनेसृष्टीपेक्षाही २० टक्क्यांनी मोठा आहे अन्नप्रक्रीया उद्योग

 


नवी दिल्ली : अन्न प्रक्रीया उद्योग हा भारतात सर्वात जलदगतीने विस्तार करणारा उद्योग आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात या क्षेत्रामुळे ७३ लाख नवे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ९० लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य या क्षेत्राने ठेवले असल्याची माहीती निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी दिली आहे. नुकताच नॅशनल रेस्ट्रॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचा अन्न प्रक्रीया अहवाल २०१९ सादर करण्यात आला त्यावेळी ही घोषणा देण्यात आली आहे.

 

हा अहवाल सादर करताना अमिताभ कांत म्हणाले कि, "भारत हा तरुणांचा देश आहे, तंत्रज्ञान वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. नागरिकांच्या वाढत्या मिळकतीमुळे ग्राहकांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी या क्षेत्रातील कर उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात या क्षेत्रामुळे सरकारच्या तिजोरीत १८०० कोटींचा कर जमा झाला आहे. हॉटेलिंगसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेही अहवाल सांगतो." या अहवालानुसार, या क्षेत्रात २०१८-१९ या क्षेत्रात प्रतिमाह ६.६ टक्के वाढ झाली आहे. एकूण २४ शहरातील १३० रेस्ट्रोरंटमधील ३ हजार ५०० ग्राहकांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

 

सिनेक्षेत्रापेक्षा २० टक्क्यांनी वाढ

या अहवालानुसार, भारतीय अन्न प्रक्रीया उद्योग क्षेत्र हे २०१८-१९ ४ लाख २३ हजार ८६५ कोटींची उलाढाल असलेले हे क्षेत्र २०२२-२३ या आर्थिक वर्षापर्यंत ९ टक्क्यांनी वृद्धींगत होऊन ५ लाख ९९ हजार ७८२ कोटींवर पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठे क्षेत्र सिनेक्षेत्रापेक्षा २० टक्के मोठे आहे.

 

ग्राहकांचा ओढा भारतीय पदार्थांकडे

एनआरएआयच्या या अहवालानुसार, भारतीय ग्राहकांची २०१८-१९ पसंती ही ग्रामीण भारतातील पदार्थ आणि पारंपारीक पदार्थांकडे आहे. याशिवाय राजस्थानी, दक्षिण भारतीय पदार्थांना जास्त पसंती दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@