नववर्ष स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2019
Total Views |



नाशिक : नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दि. १ एप्रिल ते ६ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाज जोडला जावा, यासाठी माता-भगिनी, अबालवृद्ध आणि तरुणांना एकत्र आणणारे अंतर्नाद, महाढोलवादन, महारांगोळी, लघुचित्रपट महोत्सव, सायकल रॅली व गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत श्री साक्षी गणपती मंदिर भद्रकाली कारंजा आणि श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा या दोन ठिकाणांहून दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ६.३१ मि. चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालिवाहन शके १९४५, विकारीनाम संवत्सरारंभ म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्षादिनानिमित्त यात्रा आयोजन केलेले आहे. आणखी विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन महिला-भगिनींचा संपूर्ण सहभाग असून या सर्व कार्यक्रमांचे नियंत्रण व नियोजन त्यांच्याद्वारे होणार आहेत्यानुसार ग.दि.माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि. १ एप्रिल रोजी नाशिक शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्यक्षेत्रातील १००० कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार सादर करणार आहेत.जवळजवळ ४० विविध गुरुकुलांतील आचार्य आणि त्यांचे विद्यारत १००० शिष्य तबला-बासरी-सिंथेसायझर, व्हायोलिन-हार्मोनियमच्या साथीने भरतनाट्यम- कथ्थक-भजनांद्वारे आलापी-तराना-मालकंस-केदार आदी शास्त्रीय रागांतील बंदिशींची अनुभूती घडवून आणतील.

 

महावादन - दि. २ एप्रिल २०१९ रोजी जिल्ह्यांतील ३५ ढोलपथके महावादनाचा कार्यक्रम करणार आहेत. हे वादन भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या कामगिरीला समर्पित केले जाणार आहे.

 

लघुचित्रपट महोत्सव- लघु चित्रपट महोत्सवात १) वोट फॉर भारत २) इंडिया ती भारत ३) माय फॅमिली माय स्ट्रेंथ ४) इंडियन सोल्जर ५) सामाजिक मुद्द्यांवरील साधारणत: १५ फिल्मस् प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

 

महारांगोळी - दि. ३ एप्रिल रोजी शहराच्या ८ भागांत रांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ४ एप्रिल २०१९ रोजी राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४२१ व्या जयंती वर्ष निमित्ताने २५ हजार चौरस फुटांची महारांगोळी पाडवा पटांगण, गोदाघाट येथे काढण्यात येणार आहे. या सर्व रांगोळी रचनेच्या प्रारंभासाठी नाशिकमधील शहीद जवानांच्या माता/पत्नी यांची उपस्थिती असेल व दि. ४ एप्रिल रोजी ५०० महिलांच्या सहभागातून रांगोळी रचना होणार आहे.

 

दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सेवा सरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. पाडवा पटांगण ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे सायकल रॅलीचे आयोजन केले अहे. यानिमित्त शहरातील शाळा व महाविद्यालयामधून झालेल्या निबंध स्पर्धा व चित्रकला छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाला मान्यवरगण अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नव वर्ष यात्रा स्वागत समितीचे मार्गदर्शक प्रफुल्ल संचेती आणि अध्यक्ष राजेश दरगोडे यांनी दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@