निवडणुकीपूर्वी म्हाडाने २१७ घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या घरांसाठी बँकेत अनामत रकमेसह अर्ज भरण्याची तारीख १३ एप्रिल होती. २१ एप्रिल रोजी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयातून ऑनलाईन पद्धतीने ही सोडत जाहीर होणार होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि त्वरित आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या कालावधीमध्ये म्हाडाच्या घराची सोडत जाहीर करण्यावर निर्बंध लादण्यात आले. परिणामी, म्हाडाच्या घरांची सोडत २३ मे नंतरच जाहीर होणार असल्याचे म्हाडा प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले. म्हाडाच्या घरांच्या सोडतीची तारीख जरी पुढे ढकलण्यात आली असली तरी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेत कोणताही बदल झालेला नाही. १३ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. १३ एप्रिल नंतर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. असे म्हाडा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या १० हजारांवर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांमध्ये अर्जदारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हाडाच्या घरांसाठीच्या या सोडतीचे एक वैशिष्ट आहे. ते म्हणजे यावेळी सोडतीत एकच अनामत रक्कम देऊन वेगवेगळ्या ठिकाणच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. .यापूर्वी प्रत्येक अर्जासोबत अनामत रक्कम द्यायला लागत असे.
घरांची सोडत
अल्प उत्पन्न गट (LIG)
सहकार नगर चेंबूर : २- ६४ घरं,
सहकार नगर चेंबूर : २३-४१ घरं,
सहकार नगर चेंबूर : २३-१३ घरं,
सहकार नगर चेंबूर : ३७-५२ घरं,
मध्य उत्पन्न गट (MIG)
पवई : ४६ घरं,
सहकार नगर चेंबूर : २३-०१ घरं,
ई लिलाव माध्यमातून गाळ्यांची सोडत
प्रतिक्षानगर सायन : ३५,
न्यू हिंद मिल, माझगाव : ०४,
विनोबा भावे नगर कुर्ला : १४,
स्वदेशी मिल कुर्ला : ०५,
तुर्भे मंडाले मानखुर्द : ०७,
तुंगा पवई : ०५,
गव्हाणपाडा मुलुंड : ११,
मजासवाडी जोगेश्वरी : ०१,
शास्त्रानगर गोरेगाव : ०४,
सिद्धार्थनगर गोरेगाव : ०१,
चारकोप भूखंड क्रमांक १ : २०,
चारकोप भूखंड क्रमांक २ : १९,
मालवणी मालाड : ६९,
विरार बोरीज : ५७,
वेंगुर्ले सिंधुदुर्ग : २०
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat