हल्ला झाला, पण आम्ही विमाने परतवून लावली...पाकिस्तानी लष्कराचा दावा

    26-Feb-2019
Total Views |


 
 
 
इस्लामाबाद : भारतीय वायुसेनेने मंगळवारी पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. परंतु पाकिस्तानी लष्कराने पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राईकचे वृत्त फेटाळून लावले. बालाकोट येथे हल्ला झाला, पण आमच्या प्रत्युत्तरानंतर विमाने परतली. असा दावा पाकिस्तानी लष्काराचे मेजर जनरल असिफ गफूर यांनी केला आहे. या एअर स्ट्राईकमध्ये भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला करून ३५० दहशतवादी मारले. हे वृत्त देखील पाकिस्तानी लष्कराने फेटाळले आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे असिफ गफूर यांनी म्हटले.
 

भारतीय प्रसार माध्यमांमुळे पाकिस्तान त्रस्त

 

भारतीय प्रसार माध्यमांनी पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले असल्याचे असिफ गफूर यांनी एकप्रकारे कबूल केले. भारतीय प्रसार माध्यमे अतिशयोक्ती करून काहीही दाखवतात आणि भारतीय नागरिक त्याच्यावर विश्वास ठेवतात असे असिफ गफूर यांनी म्हटले. यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय प्रसार माध्यमांनी पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाचा आणि देशातील परिस्थितीचा सातत्याने पाठपुरवठा केल्यामुळे पाकिस्तानी लष्कर त्रस्त आहे.

 

एअर स्ट्राईक झाला, त्या ठिकाणी मनुष्यवस्ती नव्हती असे म्हणत असिफ गफूर यांनी या दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त फोल ठरवण्याचा प्रयत्न केला. एअर स्ट्राईक झाला त्या ठिकाणी कोणतेही अवशेष उपलब्ध नाहीत. जर या ठिकाणी दहशतवादी मेले असते, त्यांचे मृत देह आढळले असते. असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न असिफ गफूर यांनी केला. तुम्हा सर्व पत्रकारांना घटनास्थळी नेणे शक्य नाही. शक्य असते तर मी तुम्हाला तेथील खरी परिस्थिती दाखवली असती. असेही ते या पत्रकार परिषदेत म्हणाले.

 

भारतीय लष्कराने यापूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दावा खोटा ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख असिफ गफूर यांनी केला. इमरान खान यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी असिफ गफूर यांनी भारतीय लष्कराला दिली. आमचे प्रत्युत्तर वेगळे असेल, आमचा देश लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. असे असिफ गफूर यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच या घटनेची दखल घेत पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांनी बुधवारी नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक बोलावली असल्याची माहिती असिफ गफूर यांनी दिली. नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक बोलावणे, ही काही साधीसुधी बाब नाही असेही ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121