अक्षयची 'गुड न्यूज' प्रेक्षकांच्या पसंतीस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019
Total Views |

newz_1  H x W:



अक्षय कुमार- करिना कपूर, दिलजित दोसांज- किआरा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला गूड न्यूजचित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांसह चित्रपट विश्लेषकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.


सलमान खानचा
दबंग ३चित्रपट बॉक्स ऑफिसवर असताना देखील 'गुड न्यूज'ने चांगली कमाई केली आहे. सलमान खानच्या दबंग ३चित्रपटाला मागे सारत अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटाने १८ कोटींची कमाई केली आहे. २० डिसेंबर रोजी 'दबंग ३' चित्रपट प्रदर्शित झाला होता.


याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार
, अक्षय कुमारच्या गुड न्यूजचित्रपटाने १७.५६ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस गाजवल्याने, आठवड्याच्या शेवटी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे चित्र आहे.

@@AUTHORINFO_V1@@