पाकिस्तानातील 'हे 'ऐतिहासिक हिंदू मंदिर उघडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019
Total Views |


panj tirath_1  


पेशावर : कर्तारपूर कॉरिडॉरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा हिंदू मंदिराचे दरवाजे खोलण्याचा तयारीत आहे. भारताच्या पाकिस्तानबाबत कडक पावित्र्यांनंतर पाकिस्तान आता पेशावर येथील पंज तीर्थ हे ऐतिहासिक मंदिराचे दरवाजे खोलणार आहे. या मंदिराला काही महिन्यापूर्वीच राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. पेशावरमधील प्रसिद्ध पंज तिरथउघडण्याची घोषणा नव्या वर्षात होऊ शकते.पाकिस्तानने यापूर्वीही आपल्या देशातील काही हिंदू तीर्थस्थळे उघडली आहेत. यामागेही पाकिस्तनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्यावर लागलेले डाग पुसणे हा छुपा हेतू आहे. यातून आपल्या देशाचा रिक्त खजिना भरणे हा देखील आहे.



नवीन वर्षाच्या मुहूर्तावर उघडू शकतात दरवाजे


पाकिस्तानच्या पेशावर स्थित ऐतिहासिक पंज तिरथ देशाच्या फाळणीपासून बंद आहे. हिंदूंच्या धार्मिक समजुतीनुसार
, पांडव वनवासात असताना याठिकाणी वास्तव्यास होते. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचे विस्थापित प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष अमीर अहमद यांनी सांगितले की," मंदिराची साफसफाई, विकास आणि नूतनीकरणाचे काम केले जात आहे. ते म्हणाले आहेत की, 'आम्ही जानेवारीत मंदिराचे उद्घाटन करू. यावर्षी जानेवारीत पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांताने प्राचीन तीर्थक्षेत्र पंज तिरथला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते. तेथील सरकारने या ऐतिहासिक जागेला इजा पोहोचविणाऱ्याना 20 लाख रुपये दंड आणि ५ वर्षांच्या तुरूंगवासाची घोषणा केली आहे.



'
पंज तीरथ' चे धार्मिक महत्त्व काय आहे?


अफगाण दुरानी घराण्याच्या कारकिर्दीत १९४७मध्ये हे ठिकाण पूर्णपणे नष्ट झाले. नंतर
,१८३४ मध्ये, शीख राजवटीत, स्थानिक हिंदूंनी त्याची दुरुस्ती केली आणि तेथे पुन्हा पूजा सुरू केली. पण,१९४७मध्ये झालेल्या फाळणीनंतर ते मंदिर पूर्णपणे बंद झाले. 'पंज तीरथ' तेथील पाच तलावांमुळेही ओळखले जाते. पाच तलावाव्यतिरिक्त मंदिर आणि परिसरात असलेली पाम वृक्षबाग यांसाठी ओळखली जाते. आज ही हे ऐतिहासिक स्थळ व पाचही तलाव चाचा युनूस पार्क आणि खैबर पख्तूनख्वा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या हद्दीत आले आहेत. कार्तिक महिन्यात हिंदू या तलावांमध्ये स्नान करायचे आणि दोन दिवस खजुरीच्या झाडाखाली पूजा करायचे. हिंदूंचे मत आहे की महाभारताच्या काळात माता कुंती आणि पत्नी द्रौपदी यांच्यासमवेत पाच पांडव वनवासात असताना याठिकाणी वास्तव्यास होते. हे ठिकाण पांडवांचे वडील पांडू यांचेही स्थान मानले जाते.

 

'पंज तीरथ' विषयी इतर श्रद्धा

असेही म्हटले जाते की फाळणी होण्यापूर्वी या ठिकाणी एक नव्हे तर पाच मंदिरे होती आणि हिंदू पूजेच्या आधी पाच तलावांमध्ये स्नान करायचे. मिळालेल्या माहितीनुसार, काळजी न घेतल्यामुळे उर्वरित मंदिरे पूर्णपणे उध्वस्त झाली. पुरातत्वशास्त्रज्ञ एस.एम. जफर यांनी 'एन इंट्रोडक्शन टू पेशावर' या १९५२ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात लिहिले आहे की, 'पंज तीरथ' बौद्धकालीन काळापासून पेशावरमधील प्राचीन आणि ऐतिहासिक जागांपैकी एक आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांचा विश्वास आहे की पंज तिरथ हे बुद्धांच्या भिक्षा वाडग्याचे निशाण आहे. इंग्रजी पुरातत्वशास्त्रज्ञ सर अलेक्झांडर कनिंघम आणि फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ अल्फ्रेड फूचर यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. परंतु,१८७४मध्ये तारिख-ए-पेशावरचे लेखक मुंशी गोपाळ दास यांनी मंदिराची ओळख पांडूच्या पाच मुलांसह असल्याचे सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@