"प्रत्येक भारतीय नागरिकाने नागरिकाने अंतर्गत आव्हाने सक्षमपणे हाताळायला हवेत"

    11-Dec-2019
Total Views |
na_1  H x W: 0


(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे प्रतिपादन

नाशिक : प्रत्येक भारतीय नागरिकाने नागरिकाने अंतर्गत आव्हाने सक्षमपणे हाताळायला हवेत असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले त्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्यूकेशन सोसायटीतर्फे आयोजित धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमाले प्रसंगी पूर्वांचल राज्ये सुरक्षा सद्यस्थिती, आव्हाने आणि मार्ग या विषयावर बोलत होते. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक धर्मवीर डॉक्टर बा. शि. मुंजे यांच्या १४७व्या जयंती निमित्ताने तीन दिवसीय व्याख्यानमाला नाशिक येथील गंगापूर रोडवरील डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित करण्यात आली असून . या व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहकार्यवाह नितीन गर्गे होते. तर प्रमुख वक्ते ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ‘ पूर्वांचल राज्ये सुरक्षा : सद्यस्थिती, आव्हाने आणि मार्ग’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले.

 

ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले की, पूर्वांचल मध्ये बांगलादेश घूसखोरी हे मोठे आव्हान बनत चालले असून महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात सुद्धा बांगलादेशी घुसखोर आजही आढळतात. चीन आणि पाकिस्तान या देशामुळे भारतीय सीमा सुरक्षेला आव्हान निर्माण झाले आहे. त्याबरोबर उग्र डाव्या चळवळी संबंधित नक्षलवाद आणि माओवाद हे नजीकच्या काळातील हिंसात्मक कारवाया वाढल्या आहेत. पाकिस्तान मधील सैन्यात अंतर्गत अडचणी निर्माण झाल्या आहेत ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. आयएसआय सारख्या संस्था या भारताच्या शरीरावर अंतर्गत बंडाळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेमाध्यमाद्वारे देशद्रोही लिखाण हे नजीकच्या काळातील मोठे आव्हान होऊ पहाते आहे. हा बुद्धीभ्रंश करण्याचा प्रयत्न आहे. सोशल मीडिया हे सुद्धा आव्हान असून प्रत्येकाने हे माध्यम माध्यम काळजीपूर्वक हाताळण्याची आवश्यकता आहे.

 

चीननें आपल्या देशाच्या सीमेलगत खूप मोठया प्रमाणात दळणवळण, दूरसंचार क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. भारतीय सीमेभोवती टेहळणी केंद्र, लष्करी टाळांचे जाळे उभारलेले आहे. यामुळे या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. दुसर्‍या बाजूला चीनचे अंतर्गत सुरक्षेवर बाह्य सुरक्षेपेक्षा अधिक खर्च होतो आहे. चीनचा कर्जबाजारीपणा वाढलेला आहे. झिनजियांग मध्ये इस्लामिक दहशतवादाचे केंद्र आहे. दिवाळीदरम्यान चिनी वस्तुंनी भारतात १८०० कोटी रुपयाचा नफा कमावलेला असून आपण सर्वानी या उत्पादनावर बहिष्कार घालण्याची आवश्यकता आहे.

 

येत्या काळात आतंकवादाच्या मुळाशी घाव घालण्याची गरज आहे.यासाठी आपण सर्वानी एकत्रित लढण्याचीआवश्यकता आहे. असे त्यांनी म्हटले. ईशान्य भारतातील हिंसाचार गेल्या काही वर्षात ५० टक्केहून अधिक कमी झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुग्धा जोशी आणि तेजस पुराणिक यांनी केले होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.