मुंबई (प्रतिनिधी) - अयोध्येच्या वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. मात्र, हा निर्णय आमच्याबाजूने समाधानकारक नाही, असे मुस्लिम पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फच्या वकिलांनी म्हटले आहे. या निकालाबाबच चर्चा करुन त्याला आव्हान देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे वकिलांनी म्हटले आहे.
अयोध्येची वादग्रस्त जागा रामलल्लाचीच आहे, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तीन महिन्यांमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणी मुस्लिम पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी सरकारने अयोध्येत पाच एकर जागा द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केली आहे. या निर्णयाचे सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत करत असताना निकालामधील काही मुद्यांबाबत असमाधान व्यक्त केले आहे. मुस्लम पर्सनल लाॅ बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच निर्णय मान्य असला, तरी काही मुद्यांबाबत आम्ही समाधानी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायिक बांबीवर इतर वकिलांशी चर्चा करुन निर्णयाला आव्हान देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, अयोध्येबाबत २०१० साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयालाही सुन्नी वक्फ बोर्डाने न्यायालयात आव्हान दिले होते.
--