इस्रोचा नवा विक्रम : २० वर्षात ३०० विदेशी उपग्रह केले प्रक्षेपित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |





श्रीहरीकोटा
: दोन महिन्यांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रम उतरवण्याचा प्रयत्न केला होता, जे यशस्वी होण्यापासून एक पाऊल मागे राहिले परंतु बुधवारी अंतराळ संस्थेने एक नवीन विक्रम रचला. 'पीएसएलव्ही-सी ४७'च्या सहाय्याने अमेरिकेच्या १३ नॅनो 'पृथ्वी निरीक्षण'उपग्रहांचे 'कार्टोसॅट-३'सह यशस्वीरित्या प्रक्षेपण केले.


दोन दशकांत ३३
 देशांचे ३०० हून अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्रोचा रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या टीमचे अभिनंदन करणारे ट्विट केले. त्यात ते म्हणतात की, 'पीएसएलव्ही-सी ४७'ने स्वदेशी कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण व अमेरिकेच्या एक डझनहून अधिक नॅनो उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्याबद्दल मी इस्रो टीमचे अभिनंदन करतो. इस्रोने पुन्हा एकदा देशाला अभिमान वाटेल असे कार्य केले आहे."






बुधवारी
, श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही-सी ४७ने उड्डाण करताच १७ मिनिटानंतर कार्टोसॅट-3’ यशस्वीरित्या ५०९ किमी वर जाऊन स्थिरावला. त्यानंतरच्या १० मिनिटातच अमेरिकेच्या १३ नॅनो उपग्रहांना त्यांच्या संबंधित कक्षात पाठविले. जे शत्रूच्या प्रत्येक बारीक हालचालींवर नजर ठेवेल. ,६२५ किलोग्रॅमचा कार्टोसॅट -३हा तिसरा पिढीचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे जो सर्वात जास्त रिझोल्यूशन इमेजिंग क्षमता आणि कार्टोसॅट मालिकेत नववा आहे. प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष के सिवान म्हणाले की, " ‘कार्टोसॅट -३ हा इस्रोने विकसित केलेला आतापर्यंतचा सर्वात जटिल आणि प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. ज्याचे आयुमान पाच वर्षांचे असेल."

 



तत्पूर्वी
, इस्रोने २२ मे रोजी सर्विलांस सैटेलाइट रीसैट -२ बी उपग्रह आणि १ एप्रिल रोजी एमिसैट (इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस उपग्रह)उपग्रह प्रक्षेपित केले. एमिसैट हा उपग्रह डीआरडीओला शत्रूंच्या रडारवर नजर ठेवण्यास मदत करते. मिळालेल्या माहितीनुसार, हा उपग्रह गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आणि सीमेवर दक्षता ठेवण्यासाठी वापरला जाईल. पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी कार्टोसॅट-१ आणि उपग्रहांमधून गुप्त माहिती गोळा केल्याचे सांगण्यात येते. तथापि, अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही. कार्टोसॅट उपग्रह कोणत्याही ऋतूत पृथ्वीची छायाचित्रे घेतली जावू शकतात. त्याद्वारे दिवस आणि रात्री दोन्ही बाजूंनी आकाशातून एक फूट उंचीपर्यंत स्पष्ट चित्रे जमिनीपासून काढली जाऊ शकतात.

@@AUTHORINFO_V1@@