ई-सिगारेट बंदी विधेयक लोकसभेत मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : ई-सिगारेटवरील बंदीशी संबंधित विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. यात ई-सिगरेटचे उत्पादन, विक्री, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, संग्रहण आणि जाहिरातींवर बंदी घालण्याची तरतूद आहे. ई-सिगारेटमुळे लोकांना, विशेषत: तरुणांना उद्भवणा समस्या, आरोग्यास होणार्‍या धोक्यांचा हवाला देत केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये या उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी अध्यादेश काढला होता.

ई-हुक्कावरही सरकारने बंदी घातली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी एक वर्षापर्यंतची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही आणि पुढील गुन्ह्यासाठी तीन वर्षांच्या कारावासाची तर पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असे या विधेयकात नमूद केले आहे.



ई-सिगारेटवरील बंदी तरूण आणि मुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी बुधवारी सांगितले की, जगातील अनेक तंबाखू कंपन्या भारतात ई-सिगारेट उत्पादने सादर करून तरुणांना लक्ष्य करायचे आहेत. एक जबाबदार सरकार म्हणून आम्ही त्यावर बंदी घातली आहे.

@@AUTHORINFO_V1@@