मुंबई : भारतीय नेमबाज मनू भाकर हिने २०१९च्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णझेप घेतली आहे. भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेल्या मनूने सुवर्ण पदक पटकावले आहे. दहा मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत तिने हे यश संपादन केले.
मनूने एकूण २४४.७ इतक्या गुणांसह कनिष्ठ गटातील विश्वविक्रम मोडीत काढला. दहा मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी मनू ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली असून, या आधी नेमबाज हीना सिद्धूच्या नावावर हा विक्रम आहे.
भारताच्याच यशस्वीनी देस्वाल हिनेसुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत २४१.९ गुण मिळवत सर्बियाच्या झोराना अरुनोविक हिने रौप्य पदक पटकावले. तर, चीनच्या स्पर्धकाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.