राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |



मुंबई : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत मंगळवारी मंत्रालयात पार पडली. त्यावेळी राज्यभरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आली. अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह आठ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी, लातूर मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)साठी तर ठाणे महिलांसाठी राखीव असेल.

 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण

 

अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना

अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद

अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली

अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड

नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती

नागरिकांचा मागास प्रवर्ग : ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड

खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा

खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

@@AUTHORINFO_V1@@